सांध्यांची कुरकुर थांबवण्याचे उपाय

joint
वय झाले आणि वजन वाढले की शरीरातले निरनिराळे सांधे कुरकुर करायला लागतात. गुडघे दुखायला लागतात. शरीरावर थोडा जरी ताण पडला तरी निरनिराळे सांधे अवघडायला लागतात. मात्र हे सारे निसर्गाला धरून असले तरी त्यावर काही प्रमाणात दिलासा मिळवण्यासाठी सोपे सोपे उपाय योजिता येतात. सोपा उपाय म्हणजे माणसाची हालचाल झाली पाहिजे. बैठी कामे करणार्‍या लोकांनी आपले काम करता करता जागेवरून थोडे उठावे, चार पावले चालावीत आणि शरीराला थोडीशी चालना द्यावी. सांध्यांच्या मध्ये असणारे वंगण कमी झाल्याने सांधे दुखत असतात. परंतु हालचाल केल्याने त्या वंगणाला थोडी चालना मिळते.

सांधेदुखीवर उपाय म्हणून व्यायाम केला पाहिजे हे खरे परंतु सांधेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांनी कोणता व्यायाम करावा याचे तारतम्य बाळगले पाहिजे. पळणे किंवा एरोबिक्स हे व्यायाम प्रकार कितीही चांगले असले तरी सांधेदुखी झालेल्यांसाठी योग्य नव्हेत. त्यांच्यासाठी सायकल चालवणे किंवा चालणे हे व्यायाम अधिक योग्य आहेत. योगासने ही सांधे दुखणार्‍यांसाठी जास्त उपयुक्त असतात.

वजन वाढणे हे सांधे दुखण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. तेव्हा सांधेदुखीवर उपाय म्हणून वजन घटवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तुमचे वजन १ किलोने वाढते तेव्हा तुमच्या गुडघ्यावरचे वजन दुपटीने वाढत असते. वजन घटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर असे जाणवते की वजनात झालेली थोडीशीही घट आपल्याला याबाबतीत बराच दिलासा देऊन जाते. बसताना, उठताना योग्य पध्दतीने बसणे, उठणे हेही सांधेदुखीसाठी दिलासाजनक ठरते. अशा लोकांसाठी सांगितलेल्या व्यायाम एका पायावर थोडावेळ उभा राहणे हाही एक व्यायाम उपयुक्त ठरतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment