पॅरासिटेमॉल वापरताय? सावधान

paracetamol
थोड्याफार वेदना झाल्या की पॅरासिटेमॉलची गोळी घेण्याची सवय आपल्याला लागली आहे. परंतु ही गोळी अधिकवेळा घेतल्यास आपल्या शरीरावर तिचे काय परिणाम होतात याचे भान फार कमी लोकांना आहे. थोडे डोके दुखले की घ्या पॅरासिटेमॉल असा काही लोकांचा धडाकाच असतो. दुकानात तर ही गोळी डॉक्टरची चिठ्ठी न नेता मिळू शकते. परंतु ही गोळी मनमानी आणि सातत्याने घेतली तर यकृतावर तिचे वाईट परिणाम होतात असा इशारा यकृततज्ञांनी दिला आहे. डॉक्टर अनुप मिश्रा आणि सुमन भट्टाचार्य या दोघांनी मनमानी पॅरासिटेमॉल घेणार्‍यांना सावधान केले आहे.

पॅरासिटेमॉलचा परिणाम यकृतातील एका रसायनावर होतो. हे रसायन रोगप्रतिकारक असते. मात्र सातत्याने पॅरासिटेमॉल घेतले की हे रोगप्रतिकारक द्रव्य संपून जाते आणि गोळ्या घेणार्‍यांना यकृतातल्या बिघाडाचे अनेक रोग व्हायला लागतात. यकृत बाधित होऊ शकते. आपल्या देशामध्ये डोके दुखणारे आणि गुडघे दुखणारे तसेच संधिवाताने त्रस्त असलेले लोक अशा वेदनाशामक गोळ्या सातत्याने घेत असतात. त्यांनी सावध होण्याची गरज आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment