निरोगी शरीर मिळविण्यासाठी योग्य आहार

healthy
निरोगी शरीर मिळविण्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे योग्य आहार घेणे. या काही टिप्सद्वारे तुम्ही तुमचा डाएट चार्ट बनवू शकता. आणि त्याचे नियमित पालन करून चांगले आरोग्य मिळवू शकतात.

१. रोजच्या आहारात सुकामेव्याचा वापर करा. त्यात असलेल्या ओमेगा ३ भरपूर प्रमाणात असल्याने हार्टअॅटॅक आणि डायबिटीजसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. सुकामेव्यामुळे आपण चमकदार केसांसह चांगली त्वचाही मिळवू शकतात. नाश्त्यात न चूकता अक्रोड, बदाम, पिस्ता यांचा समावेश करा.

२. मासेसुद्धा विटॅमिनचा चांगला स्त्रोत आहे. ह्दयाचे आजार, संधिवात यांसारख्या आजारांवर मासे बहुपयोगी आहेत. रवस हा मासा सर्वात सोप्या पद्धतीने बनवता येतो. रवस मासा मंद आचेवर बनवा पालेभाज्यांसहीत बनवा आणि सर्व्ह करा.

३. जर आपण कमी फॅट असलेले, मांसाहारी आणि चीजसारखे पदार्थ आपल्या खाण्यातून वर्ज्य करण्याचा विचार करत असाल तर टोफू एक चांगला पर्याय आहे. टोफू फॅट कमी करण्यात मदत करतात.

४. सोयाबीनही प्रोटीनसाठी उपयुक्त असा पदार्थ आहे. सोयाबीन स्तनाच्या कर्करोगापासूनही रक्षण करते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment