जगातील सर्वाधिक महागडी गाय

missy
महागडी गाडी, महागडे दागिने, वस्त्रप्रावरणे याबाबत आपण नेहमीच ऐकतो. जगात महागड्या प्राण्यांचीही खरेदी विक्री होत असते पण गरीब गायीलाही जबरदस्त किंमत मोजायची लोकांची तयारी असते हे कदाचित आपण ऐकले नसेल. उत्तर अमेरिकेत आढळणार्‍या हॉल्स्टिन जातीच्या गायीने हा विक्रम नोंदविला आहे. मिस्सी नावाच्या गायीला लिलावात चक्क ३० लाख डॉलर्सची किंमत मिळाली आहे.

या गायीचे पूर्ण नांव आहे ईस्टसाईड लेविसडेल गोल्ड मिस्सी. ही गाय नुसती देखणीच नाही तर ती एका वेतात ९७०० लिटर दूधही देते. आजवर अनेक स्पर्धांत तिने पहिला क्रमांक पटकावला आहे. कोणत्याही स्पर्धेत मिस्सी सहभागी होणार असेल तर तीच स्पर्धा जिंकणार याची उपस्थितांना खात्रीच असते. त्यामुळेच जेव्हा तिचा लिलाव केला गेला तेव्हा अनेकांनी तिला चांगली किंमत देण्याची तयारी दर्शविली. मुळात या जातीच्या गायी जास्त दूध देतातच पण मिस्सी तेथेही सर्वात आघाडीवर आहे. असे समजते की गेल्या ३०-४० वर्षांत अमेरिका आणि कॅनडा देशात या जातीच्या गायींची पैदास मोठ्या प्रमाणावर केली गेली आहे व त्यामुळे तेथील दूध उत्पादन तेजीने वाढले आहे.

Leave a Comment