कशी घ्याल धावपळीच्या जीवनशैलीतही आरोग्याची काळजी

excercies
तासन् तास संगणकावर काम करणाऱ्यांना पाठदुखी,लठ्ठपणा अशा समस्या जडण्याची अधिक शक्यता असते. कामासोबत करता येतील असे काही व्यायामप्रकार अमलात आणल्यास त्याचा निश्चित फायदा होईल.

सकाळी नऊपासून संध्याकाळी सहापर्यंत संगणकासमोर बसल्यामुळे अनेक शारीरिक समस्या जडू शकतात. उदाहरणार्थ लठ्ठपणा, पाठदुखी आणि डोळ्यांची जळजळ होणे.

एकाच जागेवर सतत बसल्यामुळे शारीरिक तणाव निर्माण होतो. कामाच्या धावपळीमुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही. तर ऑफिसमध्येही हलक्या व्यायामासाठी आपण थोडा वेळ काढू शकतो. हलक्या व्यायामामुळे आपले आरोग्य चांगले राहीलच तसेच कार्यक्षमता देखील वाढेल.

लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करणे हा एक अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी स्ट्रेस बॉलचा उपयोग करावा. यामुळे हातांच्या स्नायूला व्यवस्थित रक्त पुरवठा होतो आणि हातांना बळकटी मिळते. जेवणानंतर ऑफिसमध्ये थोडे फिरावे त्याचाही फायदा होतो. डोळ्यांची जळजळ थांबवण्यासाठी थंड पाणी डोळ्यांवर मारावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment