कधीकाळी माणसासारखी माकडेही गात असत

monkey
न्युयॉर्क – माणसांसारखी आवाजाची कमी-अधिक तीव्रता पुरातन काळात माकडेही ओळखू शकत होती. संशोधकांनी त्यांच्या या क्षमतेमुळेच ते कदाचित गातही असतील असा दावा केला आहे. संशोधकांनी आवाजाची कमी-अधिक तीव्रता ओळखण्याची क्षमता ही संगीताच्या निर्मितीसाठी आणि संवादासाठी आवश्यक असल्याचे मत मांडले आहे.

जॉन हॉकिन्स विद्यापीठातील संशोधकांच्या मतानुसार यापुर्वी कोणत्याही प्राण्यामध्ये अशी क्षमता असू शकते असा आम्ही विचार केला नव्हता पण आता मात्र ही बाब पुरेशी स्पष्ट झाली आहे की माकडांमध्ये अशी क्षमता असावी.

Leave a Comment