ऑडी कारपेक्षाही महाग झाली म्हैस

buffelo
हरियाणा – एका म्हैशीने हरियाणात जोरदार धुमाकूळ घातला असून येथील शेतकऱ्यापासून ते प्रसारमाध्यमांपर्यंत अनेकांच्या तोंडी या म्हैशीचेच नाव आहे. आता तर ‘काळे सोने’ म्हणूनच या म्हशीला ओळखले जावू लागले आहे. कारण या म्हैशीची किंमत ऑडी कारपेक्षाही महाग असून, ती दिवसाला तब्बल ६० लीटर दूध देते.

हरियाणामधील भिवानी येथील गुजरानी गावातील एका शेतकऱ्याकडे ही म्हैस असून या शेतकऱ्याचे नाव रामफल असे असून, त्याची ही सर्वात आवडती म्हैस आहे. दिवसातून दोन वेळा ही म्हैस दूध देते. प्रत्येकवेळी ३० असे दोन वेळचे मिळून दिवसाकाठी तब्बल ६० लिटर दूध ही एकच म्हैस देते.
हरियाणातील म्हैशीच्या झालेल्या विविध स्पर्धेंमध्येही या म्हैशीने बाजी मारली असून, अनेक बाबतीत अव्वल ठरली आहे. या म्हशीने २९.५०० लीटर दूध देत विक्रमी नोंद केली आहे. तिच्या दूधाच्या हिशोबानेच या म्हशीची किंमत ५६ लाख रूपये इतकी ठरविण्यात आली आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा पशूपालन हा जोडधंदा असतो. मात्र, अनेकदा शेतकरी या व्यवसायाकडे गांभिर्याने पाहताना दिसत नाहीत. परंतु, शेतकऱ्याने जर या व्यवसायाकडे अधिक काळजीपूर्वक व गांभिर्याने लक्ष घातले तर हरियाणातील म्हैशीसारख्या म्हैशी देशातील अनेक ठिकाणी दिसणे शक्य असल्याची चर्चा आता स्थानिक लोकांमध्ये रंगू लागली आहे.

Leave a Comment