अशी होते ईव्हीएम मशीन मतमोजणी

फोटो साभार डेक्कन हेराल्ड

बिहार विधानसभा मतमोजणी बरोबरच अन्य १० राज्यातील ५८ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक व बिहार मधील एका लोकसभा जागेसाठी पोट निवडणूक मतमोजणी सुरु झाली आहे. ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रोनिक वोटिंग मशीन मुळे मतमोजणी खुपच सहज आणि वेगवान बनली आहे आणि दिवस अखेरी निवडणुकीचे निकाल येतील. ही प्रक्रिया प्रत्यक्षात कशी पार पडते याची माहिती अनेकांना नसेल.

ईव्हीएम मतमोजणी साठी सुद्धा नियम कायदे आहेत. त्यानुसार ही सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. नियमानुसार मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार, त्याचा अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. सर्व प्रक्रिया रिटर्निंग ऑफिसरच्या देखरेखीखाली होत असते. एकावेळी जास्तीत जास्त १४ ईव्हीएम मशीन काउंटर ठेवले जातात.

या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसर, उमेदवारचा प्रतिनिधी, काऊंटिंग एजंट, ड्युटीवरील सरकारी कर्मचारी व निवडणूक आयोगाचा अधिकृत प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्याची परवानगी असते. मतमोजणी सुरु करण्यापूर्वी ईव्हीएम मशीनची तपासणी केली जाते. त्या अगोदर पोस्टाने आलेली मते मोजली जातात.

इव्हीएम चा एक राउंड संपल्यावरची दोन मिनिटे फार महत्वाची असतात. प्रत्येक राउंडनंतर रिटर्निंग ऑफिसर दोन मिनिटे थांबतात. त्या काळात उमेदवारला काही शंका वाटल्यास तो फेर मतमोजणीची मागणी करू शकतो. कधी ही मागणी मान्य होते तर कधी होत नाही. मागणी मान्य झाल्यास पुन्हा मतमोजणी केली जाते.

मतमोजणी पूर्ण झाली की रिटर्निंग ऑफिसर सर्वप्रथम आलेला निकाल निवडणूक आयोग किंवा संबंधित अधिकाऱ्यांना कळवितात आणि त्यानंतर निकालाची घोषणा केली जाते. एकदा मतमोजणी सुरु झाली की पूर्ण करूनच काम थांबविले जाते. मतमोजणी कक्षात मोबाईल नेण्यास परवानगी नसते. तसेच या ठिकाणी त्रीस्तरिय सुरक्षा असते. मतमोजणी केंद्रात केंद्रीय दलाचे पोलीस असतात तर बाहेर सुरक्षा पोलीस असतात. एन्ट्री गेटवर वरिष्ठ मॅजिस्ट्रेट असतात. या परिसरात १०० मीटर पर्यंत वाहन आत आणण्यास परवानगी नसते.