आमच्या बेरोजगार तरुणांसमोर शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही – मेहबूबा मुफ्ती


श्रीनगर – पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत आमच्या बेरोजगार तरुणांसमोर नोकरी नसल्यामुळे त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर बिहारमधील निवडणुकांवर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

तेजस्वी यादव यांचे मी अभिनंदन करू इच्छिते, कारण एवढ्या लहान वयातही त्यांनी बिहारमध्ये अन्न, वस्त्र, रोजगार, निवारा आणि कलम 370, 35 अ , जमीन खरेदी चालू दिले नाही. आज त्यांची वेळ आहे. आपल्या सर्वांची उद्या वेळ येईल. ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेत जे झाले तेच यांच्यासोबत देखील होणार असल्याचे मुफ्ती यांनी म्हटले आहे. तसेच कलम 370 हटवल्यानंतर भाजप सरकारने जम्मूमधील परिस्थिती खराब केली आहे.

त्याचबरोबर जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील लोकांच्या जमीन आणि नोकरीचा अधिकार हिरावून घेतल्याचे देखील म्हटले आहे. त्याचबरोबर जर चीनशी भारत चर्चा करू शकतो, तर मग पाकिस्तानशी का करू शकत नाही, असे देखील मुफ्ती यांनी म्हटले आहे.