सुट्टी घेण्याबद्दल येथे दिला जातो बोनस

vacation
हे स्वप्न नाही तर सत्य घटना आहे. कार्यालयात येऊन काम करावे म्हणून सगळ्याच कंपन्या कर्मचार्‍यांना पगार आणि बोनस देतात. एक सॉफ्टवेअर कंपनी अशीही आहे जी काम करण्याबद्दल नव्हे तर आपल्या कर्मचार्‍यांनी सुट्टी पूर्ण एन्जॉय करावी यासाठी भलाथोरला बोनस देते. सुटटी घ्यावी म्हणून येथे ७५०० डॉलर्स म्हणजे ५ लाख रूपये बोनस दिला जातो मात्र त्यासाठी एक नियमही आहे. जे कर्मचारी सुटी पुरेपणाने उपभोगणार नाहीत, त्यांचा बोनस कापलाही जातो. या कंपनीचे नांव आहे फूलकॉन्ट्रॅक्टस आणि यूएनमधील डेनेवर येथे ही कंपनी आहे.

कंपनीची फायनान्स आणि ऑपरेशन डायरेक्टर जेनेट रसल सांगते मी सुटीवर जाते तेव्हा मोबाईलमधून ईमेल अॅप डिलीट करून टाकते व लॅपटॉप एका कोपर्‍यात टाकून देते. कारण सुटीवर असताना कंपनीचे कोणतेही काम करायचे नाही हीच आमची पॉलिसी आहे. चार वर्षांपूर्वी आमची कंपनी स्थापन झाली आणि येथे कर्मचार्‍याची सुटी गंभीरतेने घेतली जाते. प्रत्येक कर्मचार्‍याला त्यासाठी वर्षाला भलाथोरला बोनस दिला जातो. नियम तोडणे म्हणजे बोनसच्या रकमेला मुकणे आहे.

कंपनीचे बिझिनेस डेव्हलपमेंट संचालक ड्रीऊ लॉरेन्स सांगतात, सुटीसाठी बोनस ही कल्पना आम्हाला खूपच फायदेशीर ठरते आहे. कारण सुटी एन्जॉय करून परत कामावर हजर झाले की आमचे कर्मचारी नवीन उर्जेसह येतात आणि दिलेले कामाचे टार्गेट पूर्ण शक्तीनिशी काम करून पूर्णही करतात असा आमचा अनुभव आहे.

Leave a Comment