व्हाईट हाउस मध्ये जो, जिल समवेत चँप, मेजरही मुक्कामास येणार

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांची निवड झाली आहे आणि ते लवकरच अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाउस मध्ये प्रवेश करतील. यावेळी त्याच्या सोबत फर्स्ट लेडी जिल असेलच पण आणखी दोन पाहुणे सुद्धा त्याच्यासोबत व्हाईट हाउस मध्ये मुक्काम टाकतील. जिल यांना कुत्रांची प्रचंड आवड आहे. त्यामुळे त्याच्यासोबत जर्मन शेफर्ड जातीची चँप आणि मेजर नावाची दोन कुत्रीही येणार आहेत. दीर्घकाळानंतर व्हाईट हाउस मध्ये कुत्री आणण्याची परंपरा पुन्हा सुरु होणार आहे. यापूर्वी जॉर्ज वॉशिंग्टन राष्ट्रपती असताना त्यांची कुत्री व्हाईटहाउस मध्ये आणली गेली होती मात्र त्यानंतर ती प्रथा बंद पडली होती.

जो बायडेन यांच्या निवडीचे भारत अमेरिकेसह अन्य देशातून स्वागत होत असताना यांच्या मूळ देशी म्हणजे आयर्लंड मध्ये विजय साजरा केला गेला आहे. त्यांचे पूर्वज २०० वर्षापूर्वी तेथून अमेरिकेत स्थलांतर करून आले होते.

फर्स्टलेडी जिल ६९ वर्षांच्या असून त्याच्याकडे चार पदव्या आहेत. फर्स्ट लेडीची जबाबदारी पार पाडताना त्या शिक्षिका म्हणूनही काम करणार आहेत. त्यामुळे व्हाईट हाउस बाहेर काम करण्यासाठी पगार घेणाऱ्या त्या पहिल्या फर्स्ट लेडी ठरतील. त्या नॉर्दन व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेज मध्ये इंग्रजी विषयाच्या पूर्ण वेळ प्राध्यापिका आहेत. जिल स्वतःचा पेशा सुरु ठेऊन अमेरिकेच्या २३१ वर्षाच्या इतिहासात नवी नोंद करणार आहेत. इतकेच नव्हे तर डॉक्टरेट पदवी असलेल्या त्या पहिल्याच फर्स्ट लेडी आहेत. बराक ओबामा काळात त्या सेकंड लेडी होत्या.