ही कार बदलते सरड्यासारखी रंग

car
तुमची कार जर का शॅमिलिऑन सरड्यासारखी रंग बदलायला लागली तर काय मजा येईल ना. पण असे शक्य आहे का? असा प्रश्न तुम्हाला जरूर पडला असेल, हो असे शक्य असल्याचे नुकतेच समोर आले आहे. सरड्यासारखे रंग बदलण्यामागे कोणताही मांत्रिक नाही, तर ही सर्व तंत्रज्ञानाची कमाल आहे.

या टेक्नॉलॉजीनुसार, तुमच्या कारचा रंग कोणता असावा, तो कसा एका झटक्यात बदलता येईल, तुमच्या मनाप्रमाणे कारचा रंग बदलण्याचा कंट्रोल तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये, अथवा ड्रायव्हरकडे घेता येणार आहे.

प्रिझम आकारातील मेटॅलिक पिगमेंट रोटेट बेसवर फिरतात आणि तुमच्या कारचा रंग व्हॉल्टेजच्या फ्रिक्वेन्सीवर बाहेरून, सरडयासारखा बदलतो. या तंत्रज्ञानामुळेच तुमच्या कारचा रंग बदलतो. हा रंग एक नाही दोन नाही, तर दहा-दहा पेक्षा जास्त प्रकारात बदलतो. तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Comment