संधीवाताचे पूर्वनिदान शक्य

joint-pain
आजार झाल्यानंतर त्यावर उपाय योजीत बसण्यापेक्षा तो होण्याच्या आधीच त्याचे निदान करावे आणि प्रतिबंधात्मक उपाय योजून त्याच्यामुळे होणार्‍या वेदनातून सुटका करून घ्यावी हे शहाणपणाचे लक्षण मानले जाते. म्हणून इंग्रजीमध्ये प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असा वाक्प्रचार रूढ आहे. अर्थात असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात प्रत्येक विकाराची पूर्वसूचना मिळू शकेलच असे सांगता येत नाही. फार तर एखादा आजार झाल्यानंतर प्राथमिक अवस्थेत त्याचे निदान होणे बरे असे आता तरी मानले जाते. परंतु आजार होण्याच्या पूर्वीच त्याची सूचना मिळणे जवळ जवळ अशक्य आहे.

काही चाचण्यांमधून मधूमेहाची पूर्वसूचना मिळू शकते. असे लक्षात आले आहे खरे परंतु ती पूर्वसूचना फार आधी मिळू शकत नाही. सध्या वैद्यकीय क्षेत्रातले संशोधक र्ककरोगाची पूर्वसूचना मिळू शकेल काय यावर संशोधन करत आहेत. पण तूर्तास तरी तसे काही दिसत नाही. अमेरिकेतल्या काही संशोधकांनी संधीवाताच्या बाबतीत असे होऊ शकते असा दावा केला आहे. त्यांनी रक्ताच्या एका तपासणीतून संधीवाताची पूर्वसूचना मिळू शकेल असे म्हटले आहे.

संधीवाताच्या आगमनाची चाहूल देणारी ही चाचणी थोडीबहुत नव्हे तर तब्बल १६ वर्षे आधी आपल्याला सावध करू शकते. असे या संशोधकांचे म्हणणे आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला संधीवात होण्याची शक्यता असेल तर तो होण्याच्या १६ वर्षे आधी ही चाचणी त्याला तसा इशारा देऊ शकते आणि ही रक्ताची चाचणी फार गुंतागुंतीची किंवा महागडीसुध्दा नाही. तिच्यातून रक्तातल्या काही प्रथिनांची परीक्षा घ्यावी लागणार आहे एवढेच.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment