मुख्यमंत्रीपदाची माळ तेजस्वीच्या गळ्यात पडणार ?

बिहार विधानसभा निवडणुकीत महागठ्बंधन आघाडीत महत्वाची भूमिका बजावणारे आणि राजदचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव ९ नोव्हेंबर रोजी वयाची ३१ वर्षे पूर्ण करत असून बिहार निवडणूक मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होत आहे. तेजस्वींना वाढदिवसाचे प्रेझेंट म्हणून मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार काय याविषयीची उत्सुकता खूपच ताणली गेल्याचे दिसत आहे.

लालूप्रसाद यांचे पुत्र असले तरी तेजस्वी यांनी राजकारणात स्वतःच्या हिमतीवर ओळख निर्माण केली आहे. पण अनेकांना हे माहिती नसेल की तेजस्वी राजकारणात करियर करण्यास फारसे उत्सुक नव्हते तर त्यांना क्रिकेट मध्ये करियर करायचे होते. त्यामुळे त्याची पहिली पसंती क्रिकेटला होती. आयपीएल टीमने त्या संदर्भात प्रयत्न केले होते आणि २००८, २००९, २०११ आणि २०१२ अश्या चार वर्षी तेजस्वी आयपीएल दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे सदस्य होते. पण क्रिकेट मध्ये ते प्रभाव पाडू शकले नाहीत कारण त्यांना मैदानावर उतरण्याची संधीच मिळाली नाही. अखेर त्यांनी क्रिकेटला रामराम ठोकून राजकारणात उडी घेतली.

तेजस्वी २०१६ मध्ये राजकारण सुरु केले आणि नितीश सरकार मध्ये ते उपमुख्यमंत्री आणि रस्ते निर्माण मंत्री होते. यावेळी त्यांनी रस्ते बांधकामासंदर्भात एक व्हॉटस अप नंबर जारी केला होता त्यावेळी रस्ते तक्रारीऐवजी त्यावर तेजस्वी याना सुमारे ४२ हजार विवाह प्रस्ताव मुलींकडून आले होते असे सांगितले जाते. तेजस्वी यांना शिक्षणात रस नाही. त्याचे शिक्षण ९ वी पर्यंत झाले आहे.