मनाला शांती देणारा चहा

tea
साधारण चहा हे पेय मनाला उत्तेजना देणारे मानले जाते. काम करताना थोडा थकवा आला किंवा शरीराला मरगळ आली तर एक कप चहा प्राशन केला जातो. ते गरमागरम उत्तेजक पेय शरीरात गेले की शरीर ताजेतवाने होऊन जाते. मात्र चहाचे काही प्रकार असे आहेत की त्यामुळे उत्तेजना मिळण्याऐवजी शरीर शांत होते. विशेषतः आले घातलेला चहा घेतल्यानंतर उत्तेजना मिळण्याऐवजी शरीराला विश्रांती मिळते, असे तज्ञांचे मत आहे. आले घातलेला चहा जंतुनाशक असतो आणि शरीरातले काही संसर्ग कमी करण्याची ताच्यात ताकद असते. त्याशिवाय आल्याचा चहा पचनशक्ती सुधारण्यासही मदत करतो.

चामुलीन आणि लव्हेंडर यांचाही चहा असाच उपयुक्त ठरतो असा तज्ञांचा दावा आहे. चामुलीनच्या चहाने मानसिक तणाव दूर होतो आणि लव्हेंडरच्या चहाने शरीर विश्रांतीचा अनुभव घेते. लव्हेंडरचा केवळ चहाच नव्हे तर लव्हेंडरचे चार थेंब टाकलेले बादलीभर पाणी घेऊन केलेली आंघोळ हीसुध्दा शरीरावर औषधासारखा परिणाम घडवते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment