जादा कॅलरीज जाळण्यासाठी

calories
शरीराची हालचाल न करणे आणि बैठ्या जागी काम करून वजन वाढवणे हे आरोग्यासाठी मोठेच जोखमीचे काम आहे. वैद्यकीय तज्ञांचे असे मत आहे की वजन वाढणे किंवा जाडी वाढणे हे निरनिराळ्या ३५ विकारांना निमंत्रण देणारे आहे. म्हणजे आपण वजन घटवण्याचा प्रयत्न केला तर निरनिराळ्या ३५ आजारांशी एका दमात प्रतिकार करू शकतो. निदान ते विकार आपल्याला सहजासहजी होणार नाहीत एवढी तरी नक्कीच खात्री देता येते. असे असले तरी अन्नातून मिळालेल्या जादा कॅलरीज खर्च करणे आणि त्या माध्यमातून वजन कमी करणे हे म्हणावे तेवढे सोपे आणि व्यवहार्य नाही. मात्र काही तज्ञांनी त्यावर काही सोपे उपाय सांगितले आहेत.

दिवसातून किमान वीस मिनिटे भरभर चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम होय. आजकाल लोक चालतच नाहीत. ज्या ठिकाणी चालत जाऊन काम होऊ शकते. तिथे ते गाडी वापरतात. तेव्हा ज्या कामाची घाई नसेल त्या कामाला चालत जावे. रोज वीस मिनिटे चालल्याने ४२ कॅलरीज जळतात. मोठमोठ्याने गाणे म्हटल्याने शरीराच्या आतील काही अवयवांना व्यायाम होतो. २० मिनिटे गाणे म्हटल्यास २० कॅलरिज जळतात. बसल्या बसल्या आपल्या टेबलवर ताल धरला आणि टेबलावरचा तबला वाजवला तरी काही कॅलरीज जळतात.

अशा रितीने काही सोपे उपाय सांगितले आहेत. बसल्या जागेवर पाय ताणून देणे, सार्‍या शरीराला व्यायाम होईल असे आळोखे पिळोखे देणे, एवढेच काय लहान मुलांशी खेळणे एवढ्यानेसुध्दा जादा कॅलरीज जळतात. दीर्घ श्‍वास घेणे, काही वेळ श्‍वास कोंडून धरणे एवढेच नव्हे तर मोठ्यांदा मनसोक्तपणे हसणे यानेही कॅलरीज जळतात. शरीर संबंधांनीही कॅलरीज जळतात. उभे राहिल्यानंतर उगाचच अधूनमधून एका पायावर उभे रहावे. त्यानेही कॅलरीज जळून जाडी कमी होऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment