चीनमध्ये भरतात लग्नाचे बाजार

marriage
चीनच्या शांघाय आणि अनेक शहरातून दर शनिवारी रविवारी लग्नाळू मुलामुलींसाठी मॅरेज बाजार भरविले जातात. सायंकाळी पाच पासून हे बाजार खुले होतात. विशेष म्हणजे येथे अनेक लग्ने जमतातही असे समजते. मुलींची लग्ने जमण्यास अजिबात अडचण येत नाही कारण चीनमध्ये लग्नाळू मुलींची संख्या मुळातच कमी आहे. त्याचा एक फायदा असा की येथे उपवर मुलींना चॉईस खूप मोठा मिळतो.

घरातील मुले लग्नाच्या वयाची झाली आणि त्यांनी आपापलेच लग्न ठरवले नसले तर आईवडीलांना ती जबाबदारी घ्यावी लागते.लग्न मुलीचे असो की मुलाचे आईवडिलांची झोप त्या काळजीने उडतेच. भारतासारख्या अनेक देशात आजही ही परिस्थिती आहे. त्यावरच चीन मध्ये हा उपाय काढला गेला आहे.

चीनमध्ये जागोजागी भरणार्‍या या बाजारांना मॅरेज मार्केट असे म्हटले जाते. येथे वधू वरांची माहिती रंगीबेरंगी छत्र्यांवर चिकटवून ठेवली जाते. त्यात त्यांचे फोटो, बायोडेटा, मुलामुलीच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा असाच सगळा मजकूर असतो. योग्य जोडीदार मिळाला तर येथेच लग्न पक्के केले जाते. अनेक आईवडील त्यासाठी एजंटांची नेमणूक करतात, कांहीजण स्वतःच येतात तर उपवर- वधूही स्वतःची माहिती घेऊन येथे येऊ शकतात.

वधू वरांची माहिती छत्र्यांवर लावण्यामागे दोन उद्देश असतात. उन्हापासून संरक्षण व्हावे, पाऊस आला तरीही बसता यावे आणि लग्न ठरत असेल तर छत्र्यांच्या आश्रयाने ते ठरविता यावे. एजंट म्हणून काम करणारे लोक सांगतात चीनमध्ये एक मूल पॉलिसीमुळे उपवर वधूंची चणचणच आहे. चायनीज अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसच्या म्हणण्यानुसार तर येत्या पाच वर्षात मुली न मिळाल्याने लग्न होऊ न शकलेल्या मुलांची संख्या २ कोटी ४० लाखांचा आकडा गाठणार आहे.

Leave a Comment