ऑनलाईनवर भाड्याने मिळवा आईवडील, मुलेही

japan
भाड्याने वस्तू घेणे ही परंपरा तशी जुनी.आजही भाड्याने अनेक वस्तू घेतल्या जातात. रेंट ए कार ही योजना यातूनच साकारलेली. लोक घरे भाड्याने घेतात, कार्यालये घेतात, अनेक प्रकारच्या वस्तू भाड्याने घेतात. मात्र जपानमधील रेंटएवाईफ ओहावा डॉट कॉम येथे कल्पनाही करता येणार नाही अशा सर्वप्रकारच्या गोष्टी भाड्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे ही साईट अत्यंत लोकप्रिय बनली असून त्यामुळे या कंपनीला चांगलीच कमाईही होते आहे. या साईटवर अंतर्वस्त्रांपासून ते अगदी आईवडील, बायको, मुले भाड्यावर दिली जात आहेत.

तुम्ही एकटे असाल तर या साईटवर तुम्हाला मित्र मैत्रिणी भाड्याने मिळतील. आईवडीलांच्या प्रेमाचे भुकेले असाल तर आईवडील भाड्याने मिळतील. बायको हवी असेल तर तीही मिळेल. अगदी अंतवस्त्रेही येथे भाड्याने पुरविली जातात व अंतर्वस्त्रे भाड्याने देणारी जगातली ही पहिलीच कंपनी आहे. तुम्हाला अगदी खूप कंटाळा आलाय आणि लहान मुलांसोबत खेळून तो घालवायचा आहे तर येथे लहान मुलेही भाड्याने मिळत आहेत. इतकेच कशाला, तुमची मुले आहेत पण त्यांचा होमवर्क करून घ्यायला तुम्हाला वेळ नाही तर होमवर्क करून घेणारेही येथे भाड्यावर उपलब्ध आहेत. आता बोला!

Leave a Comment