आता हॅण्डबॅग देणार पैसे खर्च करण्याचे सल्ला

hand-bag
मुंबई: खिशात पैसे असले की आपलंच आपल्यावर नियंत्रण राहत नाही आणि आपण त्याक्षणी कामाची नसलेली वस्तूही खरेदी करून टाकतो. या उधळपट्टीवर मात करण्याचा उपाय डंकन ऑफ जॉर्डनस्टोन कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईनच्या तीन विद्यार्थींनी काढला आहे.

तुम्हाला पैसे खर्च करण्यापासून थांबवणारी पर्स या दोन विद्यार्थींनी डिझाईन केली आहे. जेव्हा तुम्ही एखादी आवडलेली वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपल्या खिशाची चाचपणी करता त्यावेळी ही पर्स तुम्हाला पैसे खर्च न करण्याचा सल्ला देते. हा सल्ला व्हाईस मेसेजच्या स्वरूपात असतो. हे व्हाईस मेसेजेस, आता पैसे खर्च करण्याचा विचारही करू नका, बॅगेतील पर्स पुन्हा ठेवून द्या, ठेवून द्या. अशा प्रकारचे हे प्री रेकॉर्डेड व्हाईस मेसेजेस तुम्हाला ऐकायला मिळतील.

या पर्स डिझाईन करणाऱ्या विद्यार्थींनीची नावे रिबेका स्मिथ, लीनी फिशलर आणि किर्स्टी स्नेडन अशी आहेत. या तिघींनी या आगळ्यावेगळ्या बॅगची निर्मिती कॉलेजमध्ये सबमिट करावयाच्या प्रोजेक्टचा भाग म्हणूनच केली आहे.

तुम्ही एखादी खरेदी फक्त रोख पैसे देऊन नाही तर कार्ड वापरून करणार असाल तर तुम्हाला तुमच्या पुढच्या आवश्यक खर्चाची माहिती देऊन अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला ही पर्स देणार आहे. ही बॅग युनिसेक्स कॅटेगरीतील म्हणजे स्त्री-पुरूष अशा दोघांनाही वापरता येणारी आहे. ही बॅग कॉलेजमधील प्रोजेक्टचा भाग असल्याने अजून त्याचं व्यावसायिक उत्पादन सुरू झालेले नाही.

Leave a Comment