या प्राण्याची पूजा करून नेपाळमध्ये साजरी केली जाते दिवाळी

भारतात दिवाळीचा सण मोठ्या उत्सावात साजरा करण्यात येत असतो. दिवाळीच्या काळात चार-पाच दिवस मोठ्या उत्सावात संपुर्ण भारत प्रकाशमय झालेला असतो. आपल्या शेजारी राष्ट्र नेपाळमध्ये देखील दिवाळी साजरी करण्यात येते. मात्र येथील दिवाळी वेगळ्या पध्दतीची असते. येथे कुत्र्यांची पूजा करून दिवाळी साजरी केली जाते.

(Source)

नेपाळमध्ये दिवाळीला ‘तिहार’ म्हटले जाते. आपल्या येथील दिवाळीप्रमाणेच हा सण साजरा करण्यात येतो. लोक दिवे लावतात. नवीन कपडे परिधान करतात. मात्र आदल्या दिवशी ‘कुकुर तिहार’ साजरा करण्यात येतो. या दिवशी नेपाळमध्ये कुत्र्यांची पूजा होते.

हे पर्व 5 दिवस सुरू असते. या काळात लोक वेगवेगळ्या प्राण्यांची पूजा करतात. यामध्ये गाई, कुत्रे, बैल इत्यादी प्राणी पुजले जातात. कुकुर तिहारच्या दिवशी कुत्र्यांना हार घातला जातो. टिळा लावण्यात येतो.

(Source)

एवढेच नाही तर कुत्र्याला दही देखील खाण्यास दिले जाते. अंडी, दूध देखील देण्यात येते.  लोकांचा विश्वास आहे की, कुत्रे नेहमी त्यांच्या सोबत असतील.

मान्यतेनुसार, कुत्रे यम देवतेचे संदेशवाहक होते. नेपाळमध्ये असे समजले जाते की, कुत्रे मेल्यानंतर देखील तुमची रक्षा करतात. यामुळे त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे देखील यंदाच्या दिवाळीत एखाद्या प्राण्याला जेवायला घालू शकता. त्यामुळे तुमची दिवाळी आणखी आनंदात जाईल.

 

Leave a Comment