डोनाल्ड ट्रम्प यांचे दिवस फिरले, मेलेनिया देणार सोडचिट्ठी?


वॊशिंग्टन : सध्या जगभरात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाची चर्चा होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडेन विराजमान झाले आहेत. ते आता लवकरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्विकारतील.विजयी होण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी चांगलाच जोर लावला होता.

पण दुसरीकडे निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांच्या कौटुंबिक जीवनात देखील जो बायडेन यांच्या विजयाने परिणाम झाला आहे.

यासंदर्भातील वृत्त डेली मेल या वृत्तपत्राने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार मलेनिया डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत आहेत. हे वृत्त मेलेनिया ट्रम्प यांच्या एका पूर्व सहयोगीच्या हवाल्याने दिले आहे. डेली मेलने हे वृत्त स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्याने दिले आहे. त्यांनी त्यामध्ये असे म्हटले आहे की, १५ वर्षापूर्वी सुरु झालेले डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्यातील नाते संपुष्टात येत आहे. दोघांच्या नात्याला तडा गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प व्हाइट हाउसमध्ये वेगवेगळ्या खोल्यामध्ये वास्तव्यास आहेत. व्हाइट हाऊस डोनाल्ड ट्रम्प सोडताच दोघांमध्ये घटस्फोट होऊ शकतो. मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्पच्या लग्नाला स्टेफनी वोल्कॉफन ट्रंजेक्शनल असे म्हटले आहे.