1 वर्ष सुद्धा टिकणार नाही बायडेन यांचे राष्ट्राध्यक्ष पद – कंगणा राणावत


सोशल मिडियाच्या माध्यमातून बॉलिवूड, राजकारणी नेत्यांसह सर्वांवर टिकास्त्र सोडण्याचे अभिनेत्री कंगना राणावतचे काम जोरदार सुरु आहे. पण यावेळी तिने थेट अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर निशाणा साधला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना जो बायडेन यांनी पराभूत केले. त्याबद्दल जो बायडेन यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना आपल्या अंदाजात कंगनाने त्यांच्यावर टीका केली आहे. एक वर्ष देखील टिकणार नाही जो बायडेन यांचे राष्ट्राध्यक्षपद, असे तिने म्हटले आहे.


यासंदर्भात कंगणाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, गजनी बायडेन यांचे माहित नाही ज्यांचा डाटा दर 5 मिनिटाला क्रॅश होतो. जी औषधे त्यांना देण्यात आली आहेत, ती 1 वर्षापेक्षा जास्त टिकणार नाहीत. कमला हॅरिस हे पद चांगल्या प्रकारे सांभाळतील. जेव्हा एक महिला उठते तेव्हा ती दुस-या महिलेसाठी ती रस्ता बनवते. या ऐतिहासिक दिवसासाठी चीअर्स. या पोस्टमध्ये कमला हॅरिस यांचे कौतुक करत कंगनाने जो बायडेन यांच्यावर निशाणा साधला आहे.