विविध किमतींची अशीही नाणी

50rs
भारतीय रिझर्व्ह बँक वेळोवेळी देशाच्या चलनात कांही ना कांही बदल करत असते तसेच कांही खास प्रसंगानिमित्ताने विविध किमतींची खास नाणीही पाडत असते. १० रू. किमतीचे नाणे नुकतेच चलनात आले आहे मात्र कांही नाणी अशीही आहेत जी टांकसाळीत पाडली गेली मात्र चलनात आलेली नाहीत.

या यादीतील २५ वर्षांपूवी पाडलेले ५० रूपयांचे नाणे आता प्राचीन नाणे म्हणून ओळखले जात असून आजची या नाण्याची बाजारातील किंमत आहे दीड लाख रूपये. तांबे चांदीचे मिश्रण असलेले हे नाणे ३३ ग्रॅम वजनाचे आणि १ इंच व्यासाचे आहे. गुजराथेतील देवजीभाई गोहल यांच्याकडे हे नाणे आहे तसेच १० रूपयांचे एक जुने नाणेही आहे. ही दोन्ही नाणी त्यांनी २४ वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज करून त्याकाळी २५० रूपयांना विकत घेतली होती. देवजीभाई जुन्या नाण्यांचे शौकीन असून त्यांच्याकडे अशी दुर्मिळ अनेक नाणी आहेत.
1000rs
याच प्रकारे रिझर्व्ह बँकेने टांकसाळीत पाडलेले १ हजार रूपयांचे नाणेही देशात कांही जणांच्या संग्रही आहे. हे नाणे सरकारने तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराला १ हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रसंगी पाडले होते. याचप्रकारे कोलकाता टांकसाळीत कवी आणि गुरू रविद्रनाथ टागोर यांच्या १५० व्या जयंतीमिमित्त १५० रूपयांचे नाणे पाडले गेले होते. हे नाणे बाजारात कधीच आणले गेले नाही.२०११ साली ते पाडले गेले होते.

रिझर्व्ह बँकेने त्यांच्या प्लॅप्टिनम महोत्सवानिमित्तानेही मुंबई टांकसाळीत ७५ रूपयांचे नाणे पाडले होते. दिल्लीतील दोन व्यापार्‍यांकडे हे नाणे आहे आणि मिंट संग्रहालयातही ते पाहता येते. पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांनीही मौलाना अबुल कलम आझाद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने २० रूपयांचे नाणे तयार करवून घेतले होते. २०१३ साली हे नाणे टांकसाळीत पाडले गेले. भारत सरकारने ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक ६० रूपयांचे नाणे पाडले होते. हे नाणे २०१२ साली कोलकाता टांकसाळीत पाडले गेले होते.

Leave a Comment