द.कोरियाची खास वैशिष्टे

korea
तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगात प्रसिद्ध असलेला आणि केवळ १ लाख चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ असलेला छोटासा देश दक्षिण कोरियात अनेक गोष्टी जगातील अन्य देशांपासून खूपच आगळ्यावेगळ्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकताच द.कोरियाचा दौरा करून परतले असताना या देशाची अनेक वैशिष्ंये ठळकपणे पुढे आली आहेत.

भारतात ४०० हून अधिक द.कोरियन कंपन्या व्यापार करत असून त्यांची गुंतवणूक ३ अब्ज डॉलर्स इतकी आहे. ही गुंतवणूक जपानपेक्षाही अधिक आहे. दोन्ही देशांत १७ अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. विशेष म्हणजे मोदींच्या भेटीनंतर हा व्यापार अनेकपटींनी वाढण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

या देशात मुलांचे वय शून्यापासून मोजले जात नाही तर १ वर्षापासूनच मोजले जाते. नवीन वर्ष सुरू झाले की सर्वांचेच वय १ वर्षाने वाढते. अगदी ३१ डिसेंबरला जन्मलेले मूलही १ वर्षाचे मानले जाते व १ जानेवारीनंतर हे मूल २ वर्षाचे मानले जाते. त्यामुळे या देशाला भेट देणार्‍यांचे वय त्यांच्या मूळ वयापेक्षा १ वर्षाने जास्त धरले जाते. या प्रकारची गणना असणारा हा जगातला एकमेव देश आहे. येथे इंटरनेटचा वेग सेकंदाला २२.२ एमबीएस इतका प्रचंड आहे. या देशात स्मार्टफोन वापरणार्‍यांचे प्रमाण ७८.५ टक्के तर इंटरनेट वापरणार्‍यांचे प्रमाण ८२.७ टक्के इतके आहे.

प्लॅस्टीक सर्जरीची हा देश जगाची राजधानी आहे. यासाठी येणारा खर्च प्रचंड असूनही येथे २ हजार प्लॅस्टीक सर्जन उत्तम व्यवसाय करत आहेत. तसेच येथे क्रेडीट कार्ड घेणे बंधनकारक आहे व ते नाकारणे बेकायदेशीर ठरविले जाते. तसेच माणसाची ओळख ब्लडग्रपवरून केली जाते. म्हणजे आपण पत्रिका पाहून जसे माणसासंबंधीचे आडाखे सांगतो तसे येथे ब्लडग्रूपवरून सांगितले जातात. राजधानी सिओल येथे नागरिक रात्री फक्त ६ तासांचीच झोप घेतात तसेच माध्यमिक शिक्षण झालेल्याचे प्रमाण ९८ टक्के आहे.

या देशात २५०० विवाह मॅचमेकिंग कंपन्या आहेत. तसेच ब्लाईंड डेटचे प्रमाणही मोठे आहे. वर्षभरात येथील नागरिक १३ रोमॅटिक हॉलीडे घेतात. दर महिन्याची १४ तारीख त्यासाठी राखून ठेवली गेलेली आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वोत्तम १०० महिला गोल्फ पटूत ३८ या देशाच्या आहेत. तसेच येथे गोस्पेल चर्चमध्ये दर रविवारी किमान २ लाख नागरिक प्रार्थनेसाठी जमतात व २ ते ३ लाख घरच्या घरी टिव्हीवरून प्रार्थनेत सहभागी होतात.

Leave a Comment