एकटेपणाचा शाप

oldage
वृध्दांमध्ये केलेल्या एका पाहणीमध्ये असे आढळून आले आहे की त्यांना इतर कोणत्याही शारीरिक रोगापेक्षा एकटेपणा अधिक घातक ठरतो. एकटेपणा खायला उठल्यामुळे त्यांना अनेक मानसिक आजार जडतात आणि त्याचे परिणाम होऊन शरीरातही दोष निर्माण होतात. परिणामी अशा वृध्दांचे आयुष्य चौदा टक्क्यांनी घटते. या संबंधात संशोधन करणार्‍या तज्ञांना असे दिसून आले आहे की एकटेपणातून निर्माण झालेल्या तणावामुळे त्यांच्या पांढर्‍या रक्तपेशी तयार करण्याचे काम मंदावते.

म्हातारपणामध्ये पत्नी, मुले, सुना, नातवंडे अशा परिवाराची सोबत मिळालेल्या लोकांपेक्षा अशी सोबत नसणार्‍या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असते असे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया या विद्यापीठातील तज्ञांना दिसून आले आहे. एकटेपणाचा परिणाम मेंदूवर होतो आणि मेंदू हा शरीरातल्या अनेक यंत्रणांवर नियंत्रण ठेवणारा नियंत्रक असल्यामुळे असा परिणाम झालेला मेंदू शरीरातल्या अनेक विसंगती आणि असंतुलन यावर उपाय करू शकत नाही. त्यातून शरीरातल्या अनेक यंत्रणा बाधित होतात.

Leave a Comment