उद्दिष्ट लांबच

heart-attack
हृदयरोगाचे प्रमाण भयावह इतके वाढत आहे. २०१३ साली जगभरात हृदयाच्या विविध विकारांनी ५९ लाख अकाली मरण पावले. २०२५ सालपर्यंत हा आकडा ७८ लाखांपर्यंत जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे आणि संयुक्त राष्ट्र संघाने हे मृत्यूचे प्रमाण २५ टक्क्यांनी तरी कमी करण्याचा चंग बांधला आहे. म्हणजे २०२५ साली ७८ लाखांच्या ऐवजी साधारण ५६ लाख लोकच या विकाराला बळी पडावेत. संयुक्त राष्ट्र संघाने असे उद्दिष्ट ठरवले असले तरी सध्याची परिस्थिती पाहता हे उद्दिष्ट साध्य होईल की नाही याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. कारण उद्दिष्टपूर्तीसाठी जे उपाय योजले जाणार आहेत त्या उपायांची अंमलबजावणी म्हणावी तशी प्रभावीपणे होत नाही.

२०२५ सालपर्यंत हृदयरोगाने मरणार्‍यांचे प्रमाण अमेरिका, भारत, चीन, इथिओपिया, रशिया, मेक्सिको या देशात मोठे असेल. याचा विचार करून या उपायांचा अंमल या अधिक लोकसंख्येच्या देशातच करण्याचा संयुक्त राष्ट्रसंघाचा विचार आहे. हृदयरोगाने चाळीशीच्या आतच मरणार्‍यांचे प्रमाण अमेरिका, ब्राझील, द. आफ्रिका या देशात जास्त आहे आणि पुढच्या १०-१२ वर्षातही हेच देश आघाडीवर असतील असा अंदाज आहे. कारण हृदयविकार हा वाढत्या चैनी राहणीमानातून निष्पन्न होणारा विकार आहे आणि याच देशांचे राहणीमान वरचेवर खर्चिक होत चालले आहे. हे हृदयरोगाचे प्रमाण कमी होण्यासाठी दारू, तंबाखू, यापासून लोकांना दूर रहावे लागेल. बैठी कामे टाळावी लागेल आणि लठ्ठपणावर नियंत्रण मिळवावे लागेल.

याच गोष्टी साध्य होताना दिसत नाहीत. दगदग, जागरण, अवेळी खाणे, नको ते खाणे आणि मनःशांतीचा अभाव या गोष्टी आता लोकांच्या जीवनसाथी झाल्या आहेत. यशाची व्याख्या चुकीच्या पध्दतीने केल्यामुळे लोक यापासून दूर राहू शकत नाहीत. अधिक पैसा कमवणे म्हणजे अधिक यश या कल्पनेच्या बाहेर लोक येत नाहीत आणि परिणामी त्यांना हृदयरोगांना बळी पडावे लागते. जॉर्ज रोध हे वॉशिंग्टन युनिर्व्हसिटीतील हृदयरोग विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी देशादेशातील आरोग्याच्या सवयी आणि हृदयविकाराचे प्रमाण याचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांना असे आढळून आले आहे की निरोगी आहार अधिक व्यायाम आणि पूर्ण विश्रांती या गोष्टी साध्य झाल्याशिवाय हृदयरोगाचे रुग्ण आटोक्यात राहणार नाही. लोकांच्या आयुष्यातली दगदग वाढत चालली आहे. त्यामुळे अधिकाधिक लोक या अवांचनीय गोष्टीच्या आहारी जात आहेत. एकंदरीत हृदयविकाराचे प्रमाण वाढणे अपरिहार्य आणि अटळ आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment