दिवाळीतच केल्या जातात या गोष्टी

divali
दिवाळीची चाहूल लागत असतानाच यंदा काय खरेदी करायची, कोणते खाद्यपदार्थ बनवायचे याच्या याद्याही सुरू झाल्या आहेत. भारतातील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच उद्योग जगतासाठीही दिवाळी हा खास सण आहे. हा देशातील सर्वात मोठा शॉपिंग सिझन मानला जातो तसेच केवळ सुख समृद्धीच नाही तर वर्षभर हा आंनद टिकावा यासाठी धार्मिक व व्यावसायिक भावनाही या सणाशी जोडल्या गेल्या आहेत. कांही गोष्टी तर खास दिवाळीतच केल्या जातात.

दिवाळीची नाळ धनाची देवी लक्ष्मी हिच्याशी जोडली गेली आहे. खर्च करणे व पैसा कमावणे हे दोन्हीही या काळात शुभ मानले जाते. त्याचमुळे बाँबे स्टॉक एक्स्चेंज तसेच नॅशनल स्टॉक एकस्चेंज मध्ये मूहूर्त ट्रेडिगचे विशेष सत्र दिवाळीत साजरे केले जाते.

divali1
व्यावसायिकांसाठी दिवाळी ही नवीन आर्थिक वर्षाची सुरवात असते. पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वही खाते सुरू केले जाते व लक्ष्मी गणेशाचे पूजन केले जाते. धनत्रयोदशी ही दिवाळीच्या आधी दोन दिवस येते व या दिवशी विशेष खरेदीला प्राधान्य दिले जाते. त्यातही चांदीची खरेदी लाभदायक मानली जाते मात्र आजकाल कोणतीही नवी वस्तू या दिवशी मुद्दाम खरेदी केली जाते. अनेक घरातून रात्रीच्या वेळी लक्ष्मी व गणेशाच्या नव्या प्रतिमा खरेदी करून त्याची पूजा केली जाते.

हा काळ खरीप पिकांची कापणी व रब्बी पिकांच्या पेरणीचा काळ आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन पिकाची पूजा तसेच इश्वराची पूजा करण्याची प्रथा आहे. महत्त्वाचे म्हणजे हिंदू धर्माचे नवे संवत्सर दिवाळीपासून सरू होते. हिंदू धर्माची कालगणना चंद्र कॅलेंडरवर आधारित आहे. यंदा २०७३ संवत्सर सुरू होणार आहे.

Leave a Comment