जादूई झाड

jaduche
अपेक्षिलेले सर्व क्षणात पूर्ण करणारा कल्पवृक्ष हिंदू समाजाला पूजनीय आहे. बौध्द समाजात बोधीवृक्ष, ख्रिश्चन समाजात सतत हिरवेगार राहणारे झाड (एव्हरग्रीन ट्री), ज्यू लोकांत कबाला ही झाडे पूजनीय मानली जातात. दीर्घायुष्य, ज्ञान, सुखाचे प्रतीक असलेले हे वृक्ष प्रत्यक्षात आहेत वा नाहीत हेही अनेकांना माहिती नसते. मात्र जादूचे म्हणता यावे असे एक झाड या पृथ्वीतलावर आहे आणि मानवाच्या प्रयत्नातूनच ते तयार झाले आहे. त्याचे नांव आहे ट्री ऑफ फॉर्टी. होय नावात म्हटले आहे तसे या झाडाला खरोखरच ४० प्रकारची फळे लागतात. इतकेच नव्हे तर अनेक रंगांची आणि जातीची फुलेही त्याला येतात.

अमेरिकेतील सेराक्यूज युनिव्हर्सिटीमधील व्हिज्युअल आर्ट प्रोफेसर वॉन एकेन यांनी हे अद्भूत झाड तयार कले असून त्याची किंमत आहे ३० हजार डॉलर्स. या झाडाला बोरे, जर्दाळू, चेरी, नेक्टराईन अशी ४० प्रकारची फळे लागतात. २००८ पासून एकेन या झाडावर प्रयोग करत होते. असे झाड बनविण्याची स्फूर्ती त्यांना एक बगीचा पाहून आली. या बगीच्यात २०० प्रकारची बोरांची झाडे होती व अनेक दुर्लभ वृक्षही होते. मात्र आर्थिक चणचणीमुळे ही बाग बंद केली जाणार होती. एकेन हे स्वतः शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी ही बाग लिझवर घेतली. आणि कलमे किंवा ग्राफ्टिंग तंत्राचा वापर करून एकाच झाडावर ४० प्रकारची फळे आणि फुले येणारे झाड तयार केले. त्यांनी अमेरिकेच्या सात राज्यात अशी १६ झाडे आत्तापर्यंत लावली आहेत.

Leave a Comment