जगातील सर्वात सुंदर १० खासगी बेटे

[nextpage title=”जगातील सर्वात सुंदर १० खासगी बेटे”]
main

रोजच्या रूटीनमधून थोडा ब्रेक घेऊन, हवाबदल करून थकलेले शरीर आणि मन पुन्हा चार्ज करण्यासाठी पर्यटनाचा पर्याय अनेकजण स्वीकारतात. प्रवासाला निघायचे तर कुठे जावे यासाठी अनेक ठीकाणांचा शोध घेतला जातो. एखाद्या खासगी बेटावर शांतपणे आपली सुटी घालवायची इच्छा अनेकांना होत असते मात्र त्यासाठी बककळ पैसा हवा. आत्तापर्यंत तरी अशी सुटी ही धनिकवळीक आणि सेलिब्रिटींची मक्तेदारी राहिली आहे. कारण याच लोकांना स्वतःची बेटे खरेदी करणे शक्य असते. मात्र आजकाल अशी अनेक बेटे भाडेतत्त्वावरही पर्यटकांसाठी खुली आहेत. त्यातील १० सुंदर बेटांची माहिती आपल्यासाठी. अर्थात यातील कांहीच बेटे भाड्याने मिळतात.

आता बेट खरेदी करायची इच्छा असेल आणि त्यामानाने स्वतातले बेट हवे असेल तर उत्तर अमेरिका, पूर्व कॅनडा, यूएस सेंट्रल मध्ये ती मिळतील आणि आपल्याकडे चिकार पैसा असेल तर आपण कॅरिबियन सी, युरोप, पॅसिफिकमधील बेटांचा विचारही करू शकता.

1-Medjumbe,-Mozambique
१)मेडिजुंबे
मोझांबिक किनार्‍यापासून जवळच समुद्रात असलेले हे बेट खास एकांतासाठी आदर्श आहे कारण येथे मोबाईलची रेंज येत नाही. त्यामुळे खरेखुरे रिलॅक्स होण्याचे सुख येथे उपभोगता येते. येथल्या गोल्डन बीचवर खूप जेम स्टोन्स सापडतात. तसेच समुद्राचे दर्शन घेताना त्यात व्हेल्समासेही दिसतील. या खासगी बेटावर लोकप्रिय रिझॉर्ट असून तेथे छोटेसे रेस्टॉरंट, छोटे छोटे पूल, टांगते झुले यांचाही आनंद घेता येईल.[nextpage title=”२) चार्लस आयलंड”]

2-Charles-Island,-Bahamas

बहामातील हे आयलंड इंटरनेट सेवा उपलब्ध असलेले बेट आहे. हे बेट खासगी आहे पण बहामाशी सुलभतेने जोडलेले आहे. त्यामुळे बेटावर मुक्काम टाकला तरी दररोज जाणे येणे करून कॅरिबियन समुद्रातली अन्य सुंदर ठिकाणेही पाहणे शक्य होते. ५५ एकरांचे हे बेट ४० दशलक्ष डॉलर्सला विक्रीसाठीही आहे. येथे आलिशान घरे, डॉक्स, स्विमिंग पूल, आणि छोट्या बोटी आहेत.[nextpage title=”३) कॉटन हाऊस, मुस्तिक”]

3-Cotton-House,-Mustique

सध्या ब्रिटीश रॉयल फॅमिलीकडे असलेले हे बेट २० व्या शतकापासूनच पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. सेलिब्रिटी आणि धनाढ्य व्यक्तींनाच तेथे जाणे परवडू शकते. आणि मोठ्या संख्येने येथे सेलिब्रिटी येतातही. येथले हॉटेल अतिउच्च दर्जाचे आहे तसेच रॉयल फॅमिलीच्या हवेल्या आणि गोल्फ कार्टही आहे. या कार्टमधून संपूर्ण बेटाची सफर करता येते.[nextpage title=”४) कायो एस्पॅन्टो बेलिझ”]

4-Cayo-Espanto,-Belize

चार एकराचा परिसर असलेले हे बेट बेलिझच्या मुख्य भूमीपासून अगदी जवळ आहे. येथे आलिशान अशा सात व्हीला आहेत आणि वर्षभर त्या भाड्याने उपलब्ध असतात. सेवेसाठी अनुभवी स्टाफ असून जे हवे ते तप्तरतेने पुरविण्याची व्यवस्था येथे केली जाते त्यामुळे या स्टाफला पारितोषिकही मिळाले आहे. अर्थात जशी सेवा तशी किंमतही त्यासाठी मोजायची तयारी मात्र हवी.[nextpage title=”५) हुवाफेन फुशी”]

5-Huvafen-Fushi,-Maldives

मालदीवच्या या बेटावर जायचे असेल तर फक्त बोट किंवा सी प्लेननेच जावे लागते. पांढरीशुभ्र वाळू असलेले सुंदर किनारे, निळे निळे पाणी असे येथले सौंदर्य जगात अन्य कुठल्याच खासगी बेटावर पाहायला मिळत नाही असे म्हणतात. दुधात साखर म्हणजे येथे अंडरवॉटर स्पाही आहे. वर्षभर हे बेट भाड्यावर घेतलेले असते आणि त्यात सेलिब्रिटीजचा भरणा अधिक असतो. त्यामुळे या बेटाचे बुकींग सहजी मिळत नाही.[nextpage title=”६) व्हिला कोरालिना, ताहेती”]

6-Villa-Corallina,-Tahiti

ताहिती येथे अनेक बेटे आहेत त्यातील हे बेट खासगी छोटेसे बेट. या बेटावर एकच व्हिला आहे. तो भाड्याने मिळतो. पामची झाडे, सुंदर समुद्र किनारा थकलेल्या जीवाला शांती देतात. येथे एकांतात राहण्याची इच्छा असणार्‍यांची अगदी चंगळ आहे. कारण येथे अन्य कोणताही स्टाफ राहात नाही. अगदी जेवण हवे असले तरी ते पलिकडचा तीरावरून येते. प्रेमी युगलांसाठी हे बेट आदर्श ठिकाण आहे. दुसर्‍यात तिसरा येण्याची शक्यता येथे नाही.[nextpage title=”७)मंटाजी, फिजी”]

7-Mantaji,-Fiji

फिजी येथे अनेक खासगी बेटे आहेत. या भागात एकूण ३०० बेटे आहेत. त्यातील सर्वात सुंदर खासगी बेट म्हणजे मंटाजी. २४० एकराचा परिसर असलेल्या या बेटाचे मुख्य आकर्षण आहे येथला ज्वालामुखी. होय येथे खरोखरच ज्वालामुखी आहे मात्र तो निद्रिस्त आहे. येथे ट्री हाऊस, आऊट डोअर हॉट टब आणि रेन फॉरेस्टमधील सुंदर पायवाटांवरून केलेली सहल अशी सुखे हात जोडून उभी आहेत.[nextpage title=”८) सोनोरा रिसॉर्ट, ब्रिटीश कोलंबिया”]

8-Sonora-Resort,-British-Co

ब्रिटीश कोलंबिया मधील हे रिसॉर्ट सर्व प्रकारची हौस पुरविणारे म्हणून प्रसिद्ध आहे. येथील जेवण रसना तृप्त करणारे आहेच पण त्याचबरोबर खासगी जिम, पॅसिफिकचा स्टनिंग व्ह्यू, समुद्रातून संचार करणारे विविध मासे, जंगलाची हौस असेल तर सुंदर जंगल, रिव्हर राफ्टिंग यांच्या ही सुविधा आहेत. सामन माशाची शिकार करण्याचा छंद येथे पुरा करता येतो तसेच आकाशात उडण्याची हौसही हेलिकॉप्टर राईड घेऊन भागविता येते. फक्त पैशांनी गच्च भरलेले पाकिट सोबत ठेवावे लागते इतकीच काळजी येथे जाताना घ्यायची.[nextpage title=”९) नॉर्थ आयलंड सेशेल्स”]

9-North-Island,-Seychelles

जगातले महागडे आणि सर्वाधिक सुंदर असे हे बेट. येथे ११ विविध प्रकारच्या हवेल्या आहेत. खासगी बटलर आहेत आणि हवे तेव्हा हवे ते हादडायची सुविधाही आहे. या बेटाला मोठा किनारा आहे आणि नितांतसुंदर अनटच्ड असे अभयारण्यही आहे. येथे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले दुर्मिळ प्राणी आहेत. त्यात महाप्रचंड कासवेही आहेत.[nextpage title=”१०) इंडिगो बे- मोझांबिक”]

10--Indigo-Bay,-Mozambique

जगातील एक्सक्ल्युझिव्ह खासगी बेट अशी प्रसिद्धी असलेल्या या बेटाला लांबलचक सोनेरी वाळूच्या किनार्‍याचे वरदान लाभले आहे. त्याला जोड आहे ती डोळे थंडावणार्‍या निळ्याशार स्वच्छ पाण्याची. येथे पर्यटकांची प्रत्येक गरज पुरविण्यास तप्तर असलेली एकसो एक अशी १४ रिझॉर्ट आहेत. येथेही अभयारण्य असून तेथे आफ्रिकेतील वन्यप्राण्यांचे दर्शन होतेच पण मगरी, अॅटेलोप, व्हेल्स, डॉल्फिन्स, कासवे पाहता येतात. हिंद महासागरात हे बेट आहे.

Leave a Comment