चटपटे दाणे चाट

peanut
साहित्य- शेंगदाणे पाव किलो, १ टोमॅटो, १ मध्यम आकाराचा कांदा, हिरवी मिरची, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, साखर, लिंबू
कृती- प्रथम शेंगदाणे पाण्यात भिजवा, त्यातच चमचाभर मीठ घाला. दाणे साधारण भिजले की उकडवून घ्या. नंतर त्यातील पाणी पूर्ण निथळवा. आता यावर बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा बारीक चिरून व हिरवी मिरचीही अगदी बारीक चिरून घाला. नंतर थोडेसे लाल तिखट, चाट मसाला, थोडी साखर घालून हलक्या हाताने एकत्र करा. थोडे लिंबू वरून पिळा. कोथिबीर घालून येता जाता खायला द्या.

या दिवसांत कैर्‍या मिळतात. आवडत असेल तर लिंबाऐवजी कैरी बारीक चिरून घाला.वरून थोडी बारीक शेव, पापडी घालून खायला द्या. शेंगदाणे पौष्टीक असतात आणि उकडलेले असल्यामुळे पचायलाही चांगले असतात. तेलाचा वापर नसल्याने कुणीही खाऊ शकतात. मुलांना तर अतिशय आवडतील असा हा सोपा आणि चटकन होणारा प्रकार मुद्दाम करून पहा.

Leave a Comment