आरोग्यदायी लाल केळी

red
केळे हे बारमाही आणि जगाच्या बहुतेक भागात मिळणारे स्वस्तातले मस्त असे फळ. मात्र सर्वसाधारणपणे पिवळी आणि हिरवी केळी आपल्या पाहण्यात आणि खाण्यात असतात. लाल केळ्यांची एक जात ऑस्ट्रेलियात प्रचंड प्रमाणावर पिकविली जाते व तेथे याला रेड डका असे म्हटले जाते. वेस्ट इंडिज, मेक्सिको, जमेका, इक्वेडोर, अमेरिकेच्या अनेक भागातही ही केळी पिकविली जातात तर भारतात केरळ राज्यात ही केळी मिळतात. या केळ्यांची जगभर निर्यातही होते.

ही केळी अतिशय आरोग्यदायी असून ती चवीला आंब्यासारखी लागतात. हलका गुलाबी रंग असलेली ही केळी सी व्हिटॅमिनने समृद्ध आहेत तसेच त्यात फॅट, कोलेस्टोरॉल आणि सोडियम नाही. पोटॅशियमचे प्रमाण यात खूपच अधिक आहे व त्यामुळे ती हृदयाचे स्नायू व पचनशक्तीला बळ देणारी आहेत. यांच्या नियमित सेवनाने हृदयाचे दुखणे तसेच मधुमेहाचा धोका कमी होतो असेही आढळून आले आहे.

Leave a Comment