स्वीडनने जगाला दिल्या ‘ या ‘ गोष्टी


आपण दिवसभरामध्ये पाहत असलेल्या किंवा वापरत असलेल्या किती तरी वस्तू मुळच्या स्वीडन या देशामध्ये निर्मित होऊन नंतर त्या वस्तू साऱ्या जगामध्ये प्रचालानात आणल्या गेल्या आहेत याची आपल्याला कल्पनाही नाही. या पैकी आवर्जून उल्लेख करण्यासारखे शोध म्हणजे डायनामाइट हे विस्फोटक आणि हृदयाचे ठोके सुरळीत चालू रहावेत यासाठी वापरले जाणारे उपकरण, म्हणजेच ‘ पेसमेकर ‘. या व्यतिरिक्त स्वीडन मध्ये आणखी ही वस्तूंचे शोध लावले गेले, आणि आता याच वस्तू जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी अनोळखी, लांबच्या ठिकाणी प्रवासास निघायचे म्हणजे बरोबर कागदांवर चितारलेले त्या जागांचे नकाशे नेणे अपरिहार्य असे. पण त्या नकाशांवरून साधारण दिशांचा अंदाज बांधता येत असला, तरी आपण निवडलेला रस्ता बरोबर आहे, किंवा चूक, किंवा इच्छित स्थळी पोहोचण्याचे पर्यायी मार्ग नकाशांवरून शोधून काढणे हे अवघड काम असे. पण आता तो काळ इतिहासजमा झाला आहे. आता आपल्या हाती ‘ जीपीएस ‘( ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) सारखी अद्ययावत सुविधा आहे. होकन लॅन या स्वीडिश शास्त्रद्याने जीपीएस चा शोध लावला. आता प्रवास विमानाचा असो, किंवा सायकलचा, आपल्या प्रवासाच्या मार्गांची खात्रीशीर माहिती आपले जीपीएस आपल्याला पुरवते. ही सोय आता मोबाईल फोनच्या माध्यमातून आगदी आपल्या हातामध्ये आली असून, एखादी व्यक्ती , किंवा आपल्या घ्यायला येणारी टॅक्सी नक्की कुठवर पोचली आहे ही माहितीदेखील आपल्याला जीपीएस द्वारे मिळणे सहज शक्य झाले आहे.

कोणत्याही प्रकारच्या दुरुस्त्या करतना वेगवेगळे स्क्रू किंवा नटबोल्ट कसण्याकरिता वेगवेगळ्या रेन्चेस ( पाना ) ची गरज पडत असे. प्रत्येक स्क्रू किंवा नट बोल्टची रुंदी, आकारमान वेगवेगळे असल्याने कामगारांना पूर्वी अनेक साईझचे रेंच ( पाने ) बरोबर न्यावे लागत असत. पण स्वीडनमधील योहान पिटर जोहान्सन यांनी ‘ स्वीडिश की ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅडजस्टेबल पान्याचा शोध लाऊन, कामगारांचे ओझे हलके करून टाकले.

स्वीडनच्या निक्लास झेनस्त्र्योमने स्काईप सारख्या संभाषणमाध्यमाचा शोध लाऊन जगातील निरनिराळ्या प्रांतांमधील अंतर एकदम कमी करून टाकले. स्काईपचा शोध हाय स्पीड इंटरनेटच्या जोडीने लागल्यामुळे जगामधील दूरवरच्या कानाकोपऱ्यात असेलल्या व्यक्ती एकमेकांशी सहज संपर्क करू लागल्या. आता तर दिवाळी पासून ते अगदी ‘ करवा चौथ ‘ पर्यंत सगळे सण देखील जगभरात स्काईपच्या माध्यमातून एकमेकांना पहात साजरे होऊ लागले आहेत.

टेट्रा पॅकचे पॅकेजिंग तंत्रज्ञान स्वीडनची समस्त जगाला अमूल्य भेट आहे. आजकाल अन्नपदार्थ अनेक महीने ताजे ठेवण्यासाठी कार्डबोर्ड पॅकेजिंग वापरले जाते. दूध, फळांचे रस, ताक, दही, लस्सी, फ्रेश क्रीम ( साय ) असे कितीतरी पदार्थ टेट्रा पॅकचे तंत्रज्ञान वापरून पॅकेज केले जातात. या पॅकेजिंग मधील अन्नपदार्थ बंद स्थितीत अनेक दिवसच नाही, तर अनेक महिने देखील फ्रीजशिवाय ताजे राहू शकतात.

तसेच गाडी चालविताना सुरक्षिततेची खबरदारी म्हणून सीट बेल्ट वापरणे आता कायद्याने देखील बंधनकारक आहे. या सीट बेल्ट्स मुळे गाड्यांना भीषण अपघात झाल्यानंतरही गाडी मध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्ती बचावल्या आहेत. स्वीडिश तंत्रज्ञ नील्स बोहलीन यांनी या सीट बेल्ट ची कल्पना अस्तित्वात आणली. हा सीट बेल्ट मुळात व्हॉल्वो कंपनीच्या गाड्यांकरिता बनविण्यात आला होता. पण सुरक्षेच्या दृष्टीने सीट बेल्ट ची ही कल्पना इतकी चांगली होती, की व्हॉल्वो कंपनीने ही कल्पना स्वतः पुरती मर्यादित न ठेवता, गाड्या बनविणाऱ्या इतर कंपन्यांनाही ही कल्पना अंमलात आणण्यास प्रोत्साहन दिले.

Leave a Comment