पाकिस्तानातील हे आहे हिंदू गाव

mithi
आपल्या वाचनात नेहमीत पाकिस्तानात अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या येत असतात. पण पाकिस्तानात एक असे गाव तिथे असले काही प्रकार होत नाही. तेथील अल्पसंख्यांक हिंदू आणि मुस्लिम गुण्यागोविंदाने जीवन जगत आहेत. पाकिस्तानातील थारपारक जिल्ह्यात मिठी नामक गाव असून तिथे हिंदू-मुस्लिम एकतेचे जीवंत उदाहरण पाहायला मिळते.
mithi1
हे गाव लाहोरपासून 879 किमीवर तर कराचीपासून 278 किमी दूर आहे. मिठी भारतातील अहमदाबादहून 341 किमी दूर आहे. येथील परिसर पूर्णपणे वाळवंटमय आहे. 1990मध्ये मिठीला थारपारकर जिल्ह्याचा भाग बनवले गेले. 80 टक्के हिंदू मिठीमध्ये राहतात. जेव्हा पाकिस्तानाची निर्मिती झाली तेव्हापासून तेथील हिंदू आणि मुस्लिम एकोप्याने राहत आहेत.
mithi2
तेथील स्थानिक वर्तमानपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचा एक पत्रकार फेलोशिपसाठी गेला असता त्याला तेव्हा तिथे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील एक व्यक्ती भेटला. तेव्हा त्या व्यक्तिने सांगितले की, मी सिंधचा हिंदु रहिवाशी असून माझे आयुष्य सर्वाधिक मुस्लिमांसोबत गेले आहे. रमजानमध्ये आम्ही रोजा पाळतो, तर मोहर्रमच्यावेळी सर्वात जास्त हिंदु मुले मिरवणुकीत असतात.
mithi3
20 तासाचा खडतर प्रवास करुन पत्रकार मिठीमध्ये पोचला, तेव्हा त्याला आलेला अनुभव पाकिस्तानात कुठेच येत नसल्याचे तो म्हणाला. मिठी हे गाव नावाप्रमाणेच गोड आहे. येथे मुस्लीम गाय कापत नाहीत तर हिंदू मोहरममध्ये लग्न करत नाहीत.
mithi4
रमजानमध्ये हिंदू मुस्लिमांना जेवण देतात. ईद आणि दिवाळीत एकमेकांना मिठाई देतात. येथे फार गुन्हेही घडत नाहीत. मिठीमध्ये विकासाची भरपूर कामे होतात. पाकिस्तानातील अनेक जिल्ह्यातील लोक मिठीमध्ये येतात. येथील जमिनीत 175 बिलियन टन कोळसा आहे. जगभरातील हे 5वे सर्वात जास्त कोळशाचे भांडार असलेले गाव आहे.
mithi5
या गावातील एका मुस्लीम व्यक्तीने सांगितले की आम्ही हिंदू देवळात पूजा करतात, तेव्हा नमाजचा लाऊडस्पीकर कमी आवाजात असतो. तर रमजानमध्ये कोणी खुलेआम जेवणावळी घालत नाहीत. नमाजच्या वेळी मंदिरातल्या घंटा वाजवल्या जात नाहीत. गावात सगळे जण होळी खेळतात. सिंधच्या सरकारने एप्रिल 2014मध्ये मिठीमध्ये विद्यापीठ आणि कॉलेज बनवण्याची घोषणा केलेली. येथे सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्स देखील आहेत.

Leave a Comment