‘ग्रीन फटाके’ म्हणजे नेमके काय रे भाऊ?

दिवाळीच्या आधी बाजारात फटाक्यांविषयी लोकांमध्ये आकर्षण दिसत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे बाजारात खूप कमी फटाके पाहायला मिळत आहेत. गुगलवर सध्या ग्रीन क्रॅकर्स (फटाके) ट्रेंडिंगवर आहेत. जाणून घेऊया हे ग्रीन क्रॅकर्स नक्की काय आहेत आणि त्यांना इको फ्रेंडली का समजले जाते.

ग्रीन फटाके हे दिसताना, फुटताना आणि आवाजाच्या बाबतीत सर्वसाधारण फटाक्यांप्रमाणेच असतात. मात्र याद्वारे सामान्य फटाक्यांच्या तुलनेत कमी प्रदुषण होते. मागील दोन वर्षांमध्ये ग्रीन क्रॅकर्सची बाजारामध्ये चलती आहे. भारतात दरवर्षी ऑक्टोंबरमध्ये दिवाळीच्या काळात ग्रीन क्रॅकर्स ट्रेंड होत असते.

ग्रीन फटाके खास का ?

ग्रीन फटाके अशा फटाक्यांना म्हटले जाते, ज्यात एक रासायनिक फॉर्म्युलेशन आहे. जे पाण्याच्या मॉलिक्यूल्सचे उत्पादन करते.  यामुळे प्रदुषण खूप कमी होते. सर्वसामान्य फटाक्यांच्या तुलनेत 40-50 टक्के प्रदुषण कमी होते.

या फटाक्यांमुळे 30 ते 35 टक्के नाइट्रस ऑक्साइड आणि सल्फर ऑक्साइड सारख्या हानिकारक गॅस आणि कणांचे उत्पादन कमी करते. असे नाही की, ग्रीन फटाक्यांमुळे प्रदुषण होणार नाही. यामुळे कमी प्रमाणात प्रदुषण  व जीवघेणा गॅस कमी उत्पन्न होतो.

किती प्रकारचे असतात ग्रीन फटाके ?

ग्रीन फटाके तीन प्रकारचे असतात. यांची नावे सेफ वॉटर अँन्ड एयर स्प्रिंकलर्स (SWAS), सेफ थर्माइट क्रॅकर (STAR) आणि सेफ मिनिमल एल्यूमिनियम (SAFAL) ही आहेत. ग्रीन फटाके सामान्य फटाक्यांच्या तुलनेत कमी खर्चात तयार होतात.

 

Leave a Comment