जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत वर्षाला बनविले जातात 10 कोटी दिवे

दिवाळीचा सण आला की, दिव्यांची मागणी वाढू लागते. 1932 मध्ये गुजरातमधून महाराष्ट्रात येऊन राहिलेल्या कुंभार कुटुंबांनी जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीच्या कुंभारवाड्याला दिव्यांच्या सर्वात मोठ्या बाजाराचे स्वरूप आणले आहे. 12.5 एकर परिसरात पसरलेल्या एक हजार कुटुंबे सजावटीचे सामान बनवतात. दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने व्यापारी गोवा, सोलापूर, नागपूर, नाशिक, सुरत आणि वडोदऱ्यावरून या ठिकाणी येत आहेत. वर्षभरात येथे 10 कोटी दिवे बनवले जातात. यामुळे कुंभारवाड्याला पॉटरी व्हिलेज देखील म्हटले जात आहे.

कुंभारवाड्यातील सर्वात मोठे दिव्यांचे ट्रेडर नरोत्तम टांक सांगतात की, येथे बनवण्यात येणारे दिवे अमेरिका, ब्रिटन, कॅनेडा आणि आखाती देशात देखील पाठवले जातात. यांची ऑनलाईन देखील विक्री होते. शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी देखील येथील कारागिरांकडून प्रशिक्षण घेण्यास येतात.

धारावी प्रजापती सहकारी उत्पादक संघाचे अध्यक्ष कमलेश चित्रोदा यांनी सांगितले की, येथील प्रत्येक कुंभार कुटुंब 1 लाख दिवे बनवतात. याद्वारे महिन्याला 15 ते 20 हजार रूपये कमाई होते. दरवर्षी 8 ते 10 कोटी दिवे विकले जातात. तर 50 लाख दिवे परदेशात जातात. अन्य सजावटी वस्तूंचा येथील बाजार 1000 कोटींचा आहे.

पर्यावरणाला लक्षात घेऊन जैव इंधनावर चालणाऱ्या धुर न होणाऱ्या 7 भट्टया देखील याठिकाणी लावण्यात येतात.

संपुर्ण कुटुंब दिवे बनवण्याचे काम करते. दररोज एक कुटुंब 2 ते 5 हजार दिवे बनवतात. शाळा-कॉलेजातून परतल्यावर मुल देखील मदत करतात.

 

Leave a Comment