केरळ मंदिरात मागासवर्गीय पुजारीची प्रथमच नेमणूक

फोटो साभार मनी कंट्रोल

केरळ मध्ये प्रथमच सर्वोच्च मंदिर संचालक संस्थेने म्हणजे त्रावणकोर देवासम बोर्डाने मंदिरात मागासवर्गीय पुजारी नेमण्यास परवानगी दिली आहे. या बोर्डच्या अधिपत्याखाली १२०० प्रसिद्ध धर्मस्थळे येतात. त्यामुळे त्यांचा हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. या निर्णयानुसार अनुसूचित जाती आणि जमाती मधील एक एक पुजारी अर्धवेळ कामासाठी नेमला जात आहे.

त्रावणकोर देवासन बोर्ड ही स्वायत्त मंदिर संस्था असून भगवान अयप्पा सबरीमाला मंदिरासह बहुतेक सर्व प्रसिद्ध मंदिरे त्यांच्या अधिपत्याखाली आहेत. देवासन मंत्री कादाकंपाली सुरेंद्रन यांनी फेसबुक पोस्टवर पार्टटाईम पुजारीच्या जागा भरल्या जात असून श्रेणी यादी तयार झाल्याचे लिहिले असून ही यादी ५ नोव्हेंबर रोजी जाहीर केली गेल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २३ ऑगस्ट २०१७ मध्येच ही यादी प्रकाशित केली गेली होती तेव्हा त्यात ३१० जणांची निवड झाली होती. पण आलेल्या अर्जात अनुसूचित जाती जमातीच्या पुजाऱ्यांची संख्या पुरेशी नव्हती. त्यामुळे विशेष अधिसूचना जारी करून त्यानुसार गुरुवारी यादी जाहीर केली गेली. चार रिकाम्या जागांसाठी एकच अर्ज आला होता. आता विभिन्न मंदिरात १३३ मागासवर्गीय पुजाऱ्यांच्या जागा भरल्या गेल्याचे समजते.