हिम्मत असेल तर फिल्मसिटी युपी मध्ये नेऊन दाखवा- गरजले उद्धव

फोटो साभार इंडिया डॉट कॉम

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फिल्मसिटी मुद्द्यावरून उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आव्हान दिले आहे. हिम्मत असेल तर फिल्मसिटी उत्तरप्रदेशात नेऊन दाखवा असे उद्धव ठाकरे सिनेजगताच्या वेबीनारला संबोधित करताना गरजले. काही महिन्यांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी नोइडा येथे उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती त्याला उद्धव ठाकरे यांनी आत्ता उत्तर दिले आहे.

या वेबिनार मध्ये योगींवर निशाना साधताना उद्धव म्हणाले, आमचे सरकार बॉलीवूडच्या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना ज्या सुविधा हव्यात त्या साऱ्या पुरविल्या जातील. ज्या धरणीवर दादासाहेब फाळके यांनी चित्रपटाची निर्मिती केली, त्या भूमीत कोणतीही कमतरता भासू देणार नाही.

शिवसेना मुखपत्र सामना मध्येही काही दिवसांपूर्वी फिल्म सिटी प्रकरणात योगी यांना टार्गेट केले गेले होते. फिल्मसिटी दुसऱ्या राज्यात हलविण्याचा कट भारतीय जनता पार्टी करत असल्याचा आरोप यावेळी केला गेला होता आणि भाजपचा हा कट यशस्वी होऊ देणार नाही असे सुनावले गेले होते. काही लोकांमुळे समस्त बॉलीवूडला बदनाम केले जात असल्याचेही यात म्हटले गेले होते.