वर्षात पाचवेळा नववर्ष साजरे करणारा भारत एकमेव देश

newyear
डिसेंबर संपत आला कि जगभर नववर्षाच्या तयारीला जोरदार सुरवात होते आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक सज्ज होतात. जगभरात अनेक देश वेगळ्या परंपरा, वेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतात. बहुतेक ठिकाणी १ जानेवारीला म्हणजे इंग्लिश कॅलेंडर नुसार हा उत्सव साजरा होत असतो. भारत त्याला अपवाद असून भारतात हा उत्सव वर्षातून पाच वेळा साजरा केला जातो. येथे नाच गाण्यापासून पूजा अर्चा अश्या विविध प्रकारांनी नववर्षाचे स्वागत होते.

इतिहास असे सांगतो कि १ जानेवारीला नववर्ष साजरे करण्याची प्रथा १५८२ पासून सुरु झाली. ज्युलियस सीझर याने इ.स.पूर्व ४५ व्या वर्षी ज्युलियन कॅलेंडर सुरु केले आणि तेव्हापासून नाववर्ष १ जानेवारीला साजरे होऊ लागले.

baisakhi
भारतात अनेक प्रकारच्या जाती धर्माचे लोक आहेत आणि येथे या सर्वाना त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यानुसार पारसी लोक त्यांचे नववर्ष नवरोज नावाने साजरे करतात. हा दिवस बहुतेकवेळा १९ ऑगस्ट रोजी येतो. पारसी लोक ३ हजार वर्षांपासून हा दिवस नववर्षाचा मानतात. शाह जमशेदजी यांनी हि प्रथा सुरु केली होती. पंजाबी लोक शीख नानकशाही कॅलेंडर नुसार वैशाखी पासून नववर्ष साजरे करतात. हा दिवस बहुतेक एप्रिल मध्ये येतो. यावेळी भांगडा सारखे लोकनृत्य आवजूर्न केले जाते.

gudhi
हिंदू धर्मीय चित्र प्रतिपदा म्हणजे चैत्री पाडवा साजरा करून नववर्षाची सुरवात करतात. या दिवशी घरोघरी गुढ्या उभारल्या जातात. पूजा अर्चा केली जाते. याला पाडवा संवत असे म्हटले जाते. हाच दिवस भारतात काही ठिकाणी उगादी म्हणून साजरा होतो.

भारतात जैन धर्मीय दिवाळीच्या दुसरया दिवशीपासून नववर्ष मानतात. त्याला वीर निर्वाण संवत असे नाव आहे.

Leave a Comment