बीचवर विवस्त्र धावल्याप्रकारणी मिलिंद सोमण वर केस

मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमण याने वाढदिवशी गोव्याच्या बीचवर विवस्त्र अवस्थेत रनिंग केल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याच्यावर केस दाखल करण्यात आली आहे. काही लोकांनी हे फोटो पाहून मिलिंदच्या ५५ व्या वयातील फिटनेस बद्दल कौतुक केले असले तरी अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. मिलिंद सोमण याच्यावर इंडियन पीनल कोड सेक्शन २९४( अश्लील चाळे आणि गाणी) सेक्शन ६७ (इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये अश्लील सामग्री प्रकाशित किंवा प्रसारित करणे) असे गुन्हे नोंदविले गेले आहेत.

सोशल मीडियावर असे फोटो पोस्ट केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध तक्रार केली गेली असल्याचे समजते. सार्वजनिक जागी असे प्रकार करणे हा गुन्हा मानला जातो. फिल्ममेकर अपूर्व असरानी यांनी या संदर्भात ट्विट केले आहे की काही दिवसापूर्वी पूनम पांडे हिने सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडीओ शूट केला होता त्यानंतर केलेल्या तक्रारीवरून तिला अटक केली गेली आणि नंतर जामिनावर तिची सुटका झाली. पूनमने अर्धे कपडे तरी घातले होते. मिलिंद साठी मग वेगळा न्याय का? त्याने तर अजिबात कपडेच घातले नव्हते.