कोहलीला कर्णधारपदावरून काढा- गौतम गंभीर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे विराट कोहलीच्या नेतृत्वात विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिले आहे. शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा 6 गडी राखून पराभव झाला आणि आरसीबीचा चा संघ आयपीएल मधून बाहेर पडला. आरसीबी च्या या प्रदर्शनासाठी गौतम गंभीर ने विराट कोहलीला जवाबदार धरले असून त्याला आरसीबी कर्णधारपदावरून काढून टाकले पाहिजे अशी मागणी केली.

गौतमने विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गंभीर म्हणाले, विराट कोहलीला आता कर्णधारपदावरून काढून टाकले पाहिजे. 8 वर्षांपासून विराट हा संघाचा कर्णधार असून त्याला पदक मिळवता आले नाही. 8 वर्षे खूप काळ आहे. “मला दुसर्‍या कर्णधाराबद्दल सांगा. जरी आपण कर्णधार सोडला, तरी अशा कोणत्याही खेळाडूबद्दल सांगा, जो 8 वर्ष जिंकून न जिंकता एखाद्या संघात स्थान मिळवत होता.

गंभीर म्हणाले की, “कोहलीने आपल्या कर्णधारपदाची कमतरता मान्य करून स्वतःहून बाहेर पडावे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम अद्यापपर्यंत आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकू शकली नाही. आरसीबी व्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाबसुद्धा पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत.