यामुळे रशियाचे राष्ट्रपती करणार आपल्या पदाचा त्याग ?


मॉस्को – पुढील वर्षाच्या सुरुवातीला गेल्या २० वर्षांपासून रशियाच्या राष्ट्रपतीपदी कायम असणारे दिग्गज नेते व्लादिमीर पुतिन हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता असून पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना कबाइला आणि पुतिन यांच्या दोन मुलींनी पुतिन यांनी रशियाच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पार्किसन्स आजाराशी पुतिन हे झुंजत असून, त्यांना झालेल्या या आजाराची लक्षणे त्यांच्या हल्लीच्या फोटोंमधून दिसत आहेत.

ब्रिटिश वृत्तपत्र द सनला मॉस्कोमधील राजकीय विश्लेषक वलेरी सोलोवेई यांनी सांगितले की, पुतिन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी रशियन राष्ट्रपतींची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली दबाव आणत आहेत. पुतिन यांचे कुटुंब असून, कुटुंबातील सदस्यांचा त्यांच्यावर प्रभाव असल्यामुळे जानेवारी महिन्यात पुतिन हे सत्ता अन्य कुणाकडे तरी सोपवून कार्यमुक्त होऊ शकतात. पार्किसन्स या आजाराने रशियन राष्ट्रपती ग्रस्त असून, हल्लीच्या छायाचित्रांमधून त्यांच्यामध्ये आजाराची लक्षणे दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुतिन हे हल्लीच एका व्हिडिओमध्ये आपल्या पायांची हालचाल इकडून तिकडे करताना दिसून आले होते. द सनच्या तज्ज्ञांच्या मते वेदनेने रशियन राष्ट्रपती पीडित होते. फौजदारी कारवाईपासून रशियाचे खासदार पुतिन यांना आजन्म सूट देण्यासंबंधीचे विधेयक संसदेत दाखल करण्याचा विचार करत असतानाचा पुतिन यांच्या राजीनाम्याचा वावड्या उठल्या आहेत. पुतीन यांनी स्वत: हे नवे विधेयक सादर केले होते. पुतिन या विधेयकानुसार जिवंत असेपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईपासून सूट दिली जाईल. तसेच सरकारकडून त्यांना सर्व सवलती दिल्या जातील. रशियाची सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या आरटीनुसार हे विधेयक म्हणजे सत्तेच्या हस्तांतरणाचे संकेत आहेत. पार्किंसन्स पुतीन यांना आजार असल्याची शक्यता पहिल्यांदाच वर्तवण्यात आलेली नाही. दरम्यान, सोलोवेई यांनी सांगितले की, एक नवा पंतप्रधान लवकरच नियुक्त केला जाईल. त्याला पुतिन यांच्या संरक्षणाखाली प्रशिक्षित केले जाईल.