त्या व्हिडीओप्रकरणी पूनम पांडेंची जामीनावर सुटका


अभिनेत्री पूनम पांडे व तिचा पती सॅम बॉम्बे यांना गोवा पोलिसांनी चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी अटक केली होती. आता या प्रकरणात पूनमला जामीन मिळाला असून त्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. दरम्यान हा व्हिडीओ शूट केला जात असताना तिथे उपस्थित असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर अश्लील व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनिमून साजरा करण्यासाठी पूनम पांडे गोवा येथे गेली होती. तिने त्यावेळी चापोली धरणावर एक आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केला. विशेष पाटबंधारे खात्याच्या नियंत्रणाखाली हे धरण आहे. या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पक्षाने व्हिडीओबाबत संताप व्यक्त केला. गोव्यामध्ये सरकारी जमिनीवर अश्लील व्हिडीओ शूट करण्याची संमती कोणी दिली? गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन भाजप करु पाहत आहे का? असे सवाल करत पूनमवर त्यांनी जोरदार टीका केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी पूनम पांडे व तिच्या पतीला अटक केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड महिला शाखेच्या अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी पोलिसांकडे केली आहे.

Loading RSS Feed