मोबाईल चोरांची शाळा

thieves
शाळेत अनेक विषय शिकविले जातात. बरेचदा अनेक शाळा आपल्या विद्यार्थ्यांना विद्यावेतनही देतात. शाळातून सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांवर सुसंस्कार केले जावेत अशी अपेक्षा असते. रांचीतील सुखदेवनगर पोलिसांनी मात्र एका शाळेवर छापा घातला तेव्हा ही शाळा चोरांसाठी असल्याचे निष्षन्न झाले. इतकेच नव्हे तर येथे शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतनही दिले जात असल्याचे दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार ही शाळा खास मोबाईल चोर्‍या कशा कराव्यात याचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत होती. हे सांगायला नकोच की पोलिसांनी छापा टाकल्यावर पाच जणांना अटकही केली. तेथे शिकणार्‍या विद्यार्थ्यांकडे चौकशी करण्याचे काम सुरू आहे.या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्तकौशल्याप्रमाणे दरमहा ५ ते १० हजार रूपये विद्यावेतन दिले जात असल्याचेही उघडकीस आले आहे. शाळेतून पोलिसांनी शेकडो सिमकार्ड, स्मार्टफोन हस्तगत केले आहेत.

Leave a Comment