टकलूंना या रेस्टॉरंटमध्ये मिळतात खास सवलती

japan
टककल पडणे हे पुरूषांच्या दृष्टीने चांगले लक्षण मानले जात नाही.अर्थात त्यावर टककल वाल्यांना पैसा कमी पडत नाही अशा समजुतीच्या गोष्टीही पसरविल्या जातात. मात्र टक्कल वाल्यांचे दुःख तेच जाणोत. जपानमधील एका रेस्टॉरंटने खास टक्कलवाल्यांना म्हणून काही सवलती दिल्या आहेत. मालकिणीच्या मते या लोकांना एकटे वाटू नये तसेच टकलूही आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत असे त्यांना वाटावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी या सवलती दिल्या जात आहेत.

या रेस्टॉरंटची मालकीण योशिको टोयोडा सांगते, जपानमध्ये टक्कल हा अतिशय संवेदशनशील मुद्दा आहे. पुरूष टक्कल पडायला लागले की नर्व्हस होतात, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, त्यांना अनेकदा निराशा येते असा अनुभव आहे. म्हणूनच आम्ही त्यांचा आत्मविश्वास परत मिळावा म्हणून त्यांच्या खाण्यापिण्यावर खास सवलत देतो. इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्यासारखेच आणखी टकलू मित्र सोबत आणले तर जास्त डिस्काऊंट देतो. डिस्काऊंट मिळत असल्याने टकलूंच्या चेहर्‍यावर आनंद दिसतो आणि आमचाही व्यवसाय चांगला होतो.

जाता जाता टक्कल असण्याचे आणखी कांही फायदेही सांगायला हवेत.या लोकांना शांपू, कंडिशनर यांचा खर्च करावा लागत नाही. कंगवा खरेदी करावा लागत नाही आणि जाईल तेथे तो बाळगावाही लागत नाही. उकाड्याचा त्रास कमी होतो. पावसात डोके भिजले तरी सर्दी होईल ही भीती राहात नाही कारण डोक्यावर केसच नसल्याने केसात पाणी मुरण्याचा संबंधच येत नाही

Leave a Comment