आजीबाई रोज खातात किलोभर माती

grandmother
काजरी नुरपूर : आपण अनेकदा लहान मुलांना माती खातांना पाहतो. शिवाय मोठ मोठे खवय्ये बघीतले असतील, परंतु असा खवय्या नक्कीच पाहिला नसेल की, जो मोठ्या आवडीने दररोज एक किलो माती असेल. मात्र उत्तर प्रदेशमधील ९० वर्षांच्या आजी दररोज तब्बल १ किलो माती खातात. माती खाल्ल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही.

उत्तर प्रदेशच्या शाहजहां जिल्ह्यातील काजरी नुरपूर गावात राहणास-या ९२ वर्षीय सुदामा देवी यांच्याबद्दल बघून सर्वोनांच आश्चर्याचा धक्का बसतो. सुदामा देवी आपल्या या मातीच्या खाण्याच्या छंदाबद्दल सांगतात, त्या १० वर्षाच्या असतांना मैत्रिणींनी गमती-गमतीत माती खायला सांगितली. एवढेच नाही तर माती खाण्याची शर्यत लावली होती. तेव्हा पहिल्यांदा माती खाल्ली. तेव्हापासून म्हणजे तब्बल ८० वर्षांपासून त्यांना माती खाण्याचा छंदच लागला आहे. दिवसातून चार वेळा त्या माती खातात.

दररोज १ किलो माती खाऊन त्या ती पचवतात सुद्धा… कोरडी माती खाण्यापूर्वी त्या थोड़ी माती एका ग्लासमध्ये पाण्यासोबत मिसळून पितात. याशिवाय संत्र्याला पण कोरडी माती लावून खातात.

सुदामा देवी आणि पती कृष्ण कुमार यांना एकूण १० मुले झाले. ७ मुले आणि ३ मुली. मात्र त्यातील आता केवळ ३ मुले आणि १ मुलगी जिवंत आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्णपणे फिट सांगितले आहे. स्वत: सुदामा देवीला पण आपल्या या छंदाचा त्रास नाही. सुदामा देवी कधीही आपल्याला भूक लागत नसल्याची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे गेल्या नाहीत. हैराण करणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या पोटात दुखले अशी तक्रार कधी आलेली नाही. सुदामा देवी कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांना जेवणात माती जास्त आवडते. त्या माती अतिशय सहजतेने खातात. लग्नाच्या देखील त्यांना माती खाण्यासाठी देण्यात आली होती.

Leave a Comment