सव्वा दोनशे वर्षापूर्वीची पेनी साडेसात कोटी रूपयांना

penny
अमेरिकेतील पहिल्या कांही पेनीतील एक पेनी ( १ सेंटचे नाणे) लिलावात तब्बल १.२ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ७ कोटी ५८ लाख रूपयांना विकली गेली. स्टॅक्स बोअर्स गॅलरीने हा लिलाव केला. ही पेनी २२३ वर्षांपूर्वीची आहे.

अमेरिकन संसदेने सेंट ला (डॉलरचा १०० वा भाग) मान्यता दिल्यानंतर १७९२ साली या पेनी तयार करण्यात आल्या. पहिल्यांदी टांकसाळीत पाडल्या गेलेल्या कांही पेनींतील १० पेनी आज जगात शिल्लक आहेत. लिलावात विकली गेलेली पेनी त्यातील एक आहे. बिर्च सेंट अशा नावाने ती ओळखली जाते. सध्याच्या पेनीपेक्षा ही जुनी पेनी आकाराने दुप्पट मोठी आहे. तिच्यावर मिस लिबर्टीची प्रतिमा कोरली गेली आहे. याच लिलावात १८६१ सालच्या अर्धा डॉलरचीही ४ कोटी रूपयांना विक्री करण्यात आली.

Leave a Comment