शेवई इडली

idli
साहित्य- १ वाटी शेवया, अर्धी वाटी रवा, १ वाटी दही, १ चमचा उडीद डाळ, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, कढिलिंब, बारीक चिरलेले आले, १ हिरवी मिरची बारीक चिरून, इनो सॉल्ट, चवीनुसार मीठ

कृती- प्रथम शेवया कुस्करून घ्याव्यात. नंतर रवा आणि शेवया एकत्र करून कढईत गुलाबी रंगावर भाजून घ्यावे, दही चांगले फेटावे आणि त्यात आले, हिरवी मिरची तुकडे घालावेत.एका कढईत १ मोठा चमचा तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, कडिलिंब, उडीद डाळ घालून फोडणी करावी आणि दह्यावर घालावी आणि हे सर्व मिश्रण भाजून घेतलेल्या रवा शेवईत मिक्स करावे. चांगले हलवून थोडा वेळ ठेवावे.
नंतर इडली पात्राला तेलाचा हात लावून रवा शेवई मिश्रणात इनो घालून फेटावे आणि इडली पात्रात इडल्या घालून कुकरमध्ये उकडाव्यात. गरमागरम खायला द्याव्यात. सोबत चटणी द्यावी.

Leave a Comment