लग्नानंतर येथे नवरेबुवांचीच होते पाठवणी

muslim
लग्न लागल्यानंतर वधूने वराच्या घरी म्हणजे सासरी जाण्याची परंपरा बहुतेक ठिकाणी आहे. भारतात तर सर्वत्र हीच परंपरा आहे. मात्र उत्तर प्रदेशातील कौशांबी जवळ एक इलाका असा आहे ज्याचे नावच मुळी जावयांचे छोटे गांव – म्हणजे जमाई इलाका असे आहे. येथे घरजावई करून घेण्याची पद्धत आहे. ६० कुटुंबे या इलाक्यात राहतात आणि त्यातील बहुसंख्य मुस्लीम आहेत. येथे विवाहानंतर जावयाला सासरचे लोक रोजगार साधने पुरवितात आणि जावई आपले घर सोडून येथे रहायला येतात.

येथील एक अधिकारी पुरनेंदूसिग म्हणाले गेली ३५ वर्षे ही परंपरा येथे पाळली जात आहे. जावई मोहल्ल्यात बाहेरून आलेले रहिवासीच अधिक संख्येने आहेत. हे जावई डेअरी, जनरल स्टोअर्स, छोटी मोठी दुकाने असे व्यवसाय करतात. या गावाचे मूळ नांव हिंगुलपूर. येथे राहणार्‍या कमरूद्दीन यांनी आपल्या मुलीचे लग्न केले तेव्हाच त्यांनी जावयाला येथे रहावयास आणले. तेव्हापासून या दोन्ही कुटुंबांची भरभराट झाली आणि जावईच गावात राहायला आणण्याची ही अनोखी प्रथा सुरू झाली असे सांगतात.

या गावात राहणारे जावई आणि त्यांचा बायका म्हणजे गावच्या लेकी आनंदाने संसार करत आहेत. मुली सांगतात आईवडील जवळ असल्याने मानासिक आधार राहतो तसेच त्यांच्या अडचणीच्या वेळा चटकन मदत करता येते. तर आईवडीलांना मनात आले की पाच मिनिटात मुलीची भेट घेता येते. आजही येथील वातावरण पाहन जावई आनंदाने घरजावई होण्यास संमती देतात हे विशेष

Leave a Comment