या आहेत जगातील महागड्या जीन्स

फोटो साभार लग्झाटीका

उंचे लोग उंची पसंद म्हणजे श्रीमंताच्या आवडी सुद्धा महागड्या. श्रीमंत लोक पिण्याच्या पाण्यापासून ते कपडे, गाड्या यांच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. प्रत्येक महाग वस्तू आपण वापरलीच पाहिजे असे त्यांना वाटते. कपड्यांचा विचार करायचा तर जगात काही कंपन्यांच्या जीन्स या इतक्या महाग आहेत की फक्त श्रीमंत लोकच त्या खरेदी करायची हिम्मत दाखवू शकतात.

मुळात जीन्सची क्रेझ जगभर आहे. त्यातही सर्वसामान्य, महाग म्हणजे फारतर २ किंवा पाच हजार रुपयाची जीन्स म्हणजे चैन समजतात. पण या महाग जीन्सची किंमत ऐकली तरी एखादा सर्वसामान्य माणूस बेशुद्ध होऊ शकेल. या जीन्सच्या किमती इतक्या प्रचंड आहेत की त्याच्या किमतीत एखाद्याला जागांचे भाव गगनाला भिडलेल्या मुंबईत दोन घरे विकत घेता येतील.

सिक्रेट सर्कस कंपनीच्या जीन्स १३ लाख डॉलर्स किमतीच्या आहेत. त्याच्या मागच्या खिशावर १५ हिरे जडविलेले असतात. ही किमत रुपयात होते साधारण ९ कोटी ३६ लाख. या किमतीत मुंबईत दोन घरे नक्कीच विकत घेता येतील. डेसॉल्ट अॅपरल थ्रॅशड डेनिम या फिटिंग साठी अतिशय फेमस आहे. त्या हँडमेड असून १३ वेळा वॉश, डाइंग, पेंटिंग अशी प्रक्रिया केली जाते. या जीन्स ८० हजार ते २,५०,००० डॉलर्स अशा किमतीच्या आहेत.

लेवी स्ट्रॉस आणि कंपनीच्या जीन्स ११४०० ते ६० हजार डॉलर्स अश्या किमतीत येतात. या कॅलिफोर्नियन कंपनीची स्थापना १८५३ मध्ये झाली असून लेवी क्वालिटी आणि व्हिंटेज कलेक्शन साठी विशेष प्रसिद्ध आहे. एस्कडा कंपनी कडून तुम्ही तुमच्या पसंतीची जिन्स बनवून घेऊ शकता. त्याच्या किमती १० हजार डॉलर्स ते दीड कोटी च्या दरम्यान आहेत.