बहुगुणी, बहुरूपी हँडबॅग

jacket
बाजारात आता अशी एक हँडबॅग आली आहे जी तुमच्या बहुतेक सर्व गरजा पूर्ण करू शकणार आहे. म्हणजे पाण्याच्या बाटल्या, सौंदर्यप्रसाधने, अन्य बारीक सारीक वस्तू त्यात ठेवता येतील आणि फॅशन आयकॉन म्हणूनही ती वापरता येईल. इतकेच नव्हे तर यापेक्षाही अधिक खूप कांही ही हँडबॅग देऊ शकणार आहे.

या हँडबॅग च्या उपयुक्ततेबाबत ही यादीच वाचा ना! सामान ठेवण्याबरोबरच या हँडबॅगचा वापर जॅकेट म्हणूनही करता येणार आहे. त्याशिवाय तुमच्या पाळीव कुत्र्यासाठी घर, फोन चार्ज करणे, खाण्याचे पदार्थ रेफ्रिजरेट करणे, जिम किटचे वजन पेलणे असे या हँडबॅगचे अनेक उपयोग आहेत. हँडबॅगचे जॅकेट बनविताना केवळ एक चेन उघडली की कांही सेकंदात तिचे जॅकेटमध्ये रूपांतर होते. या जॅकेटलाही २२ खिसे आहेत. त्यातील मोठ्या खिशात लॅपटॉप, आयफोन, पासपोर्ट, मनी पर्स, पुस्तकेही ठेवता येतात.

सुट्टीवर चालला असाल तर मोठी बॅग बरोबर न बाळगता केवळ ही हँडबॅग घेतली तरी त्यात तुमच्या गरजेच्या सर्व वस्तू व्यवस्थित बसतात असे बॅग बनविणार्‍या डिझायनरचे म्हणणे आहे. अनेक आकर्षक रंगात ती उपलब्ध आहे.

Leave a Comment